घरमहाराष्ट्रनाशिकRaj Thackeray: सर्व मागण्या मान्य, फक्त आरक्षण दिलं नाही; राज ठाकरेंचा खोचक...

Raj Thackeray: सर्व मागण्या मान्य, फक्त आरक्षण दिलं नाही; राज ठाकरेंचा खोचक टोला, म्हणाले, … मग आता उपोषण का?

Subscribe

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी विजयोत्सव साजरा केला. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. मग, आता ते पुन्हा उपोषणाला कशासाठी बसतायत, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी यावेळी मराठा आरक्षणावर आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी विजयोत्सव साजरा केला. त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. मग, आता ते पुन्हा उपोषणाला कशासाठी बसतायत, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. (Raj Thackeray All demands accepted only reservation not given Raj Thackeray s Khochak Tola said then why fast now)

मी आधीच सांगितलं होतं आरक्षण मिळणार नाही

मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, लोकांसमोर मी सांगितलेलं हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा बोललो होतो ही हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीरबाबी यात आहेत, त्यामुळे असा निर्णय सरकार घेऊ शकणार नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाव लागेल. अनेक प्रोसेस आहेत. मला वाटतं मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे.

- Advertisement -

त्यांना कळालं का, काय झालं?

मुख्यमंत्री त्यादिवशी तिथे गेले होते. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधव त्या मोर्चाला गेले होते, त्यांना कळलं का, काय झालं? विजय झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता? असा प्रश्न राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे.

मराठी शाळा सेमी इंग्लिश करा. त्याशिवाय चालणार नाहीत. बालमोहन विद्यामंदिर शाळा सेमी इंग्लिश केली. आज 100 टक्के शाळा भरली, असं राज ठाकरे म्हणाले. मराठी शाळा बंद होत आहेत यावर राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं.

- Advertisement -

ईडीच्या कारवाया महाराष्ट्रात होतात, त्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, अशा प्रकारचं राजकारण भाजपालाही परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. उद्या दुसरे तुमच्या अंगावर येतील, तेव्हा काय करणार? असा सवालही त्यांनी केला.

लोकसभेचं काही सांगता येत नाही

राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. शाश्वत ठोकताळे देता येत नाहीत. आता यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. 1995 सालच्या निवडणुका या बाबरी मशिदीचा ढाचा पाडणं, बॉम्बस्फोट या मुद्यावर झालेल्या लोकांनी त्या रागातून मतदान केलं होतं. काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेना- भाजपा युतीला मतदान केलं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.

( हेही वाचा: Uddhav Thackeray Vs BJP : आज शिवाजी महाराज हयात असते तर…; आव्हाडांचा भाजपावर निशाणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -