अजय चौधरी, सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता, शिंदे गट कोर्टात धाव घेण्याची शक्यता?

sunil prabu

राज्यातील सत्तासंघर्ष दिवसागणिक वाढताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत महाप्रलय आला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी तर सुनील प्रभू यांची पक्षप्रमुख व्हीप म्हणून नियुक्ती करण्याचा शिवसेनेचा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. परंतु शिंदे गट आता कोर्टात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने कार्यवाही करत त्यांची गटनेते पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती. मात्र, यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदे हेच आमचे गटनेते असल्याचा दावा शिंदे गटातून करण्यात आला होता. तर प्रतोद पदावर सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी झिरवळ म्हणाले की, कायद्यानुसार अजय चौधरी हेच गटनेते प्रमुख असतील तर सुनील प्रभू हेच प्रतोद असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची सेना विधिमंडळ पक्षनेते तर सुनील प्रभू यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा शिवसेनेचा अर्ज त्यांनी मंजूर केला आहे. याचाच अर्थ सुनील प्रभू व्हीप बजावू शकतात. परंतु आता शिंदे गटाची काय रणनिती असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता