घरमहाराष्ट्रशरद पवारांचा निर्णय उत्साह वाढवणारा; अखेर अजित पवार आले समोर

शरद पवारांचा निर्णय उत्साह वाढवणारा; अखेर अजित पवार आले समोर

Subscribe

 

मुंंबईः शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला गैरहजर असणाऱ्या अजित पवार यांनी ट्वीट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय उत्साह वाढवणारा आहे. महाविकास आघाडीला बळ देणारा आहे, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

 

राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे, असे अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं या आग्रहास्तव अध्यक्ष निवड समितीनं त्यांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला. तेच अध्यक्षपदी कायम राहतील,हा निर्णय एकमतानं झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात,देशात उज्ज्वल यश संपादन करेल, असा दावाही अजित पवार यांनी ट्वीटमध्ये केला आहे.

एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन मी करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत, असेही अजित पवार यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -