Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAjit Pawar : लोकसभेत विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न; पवार स्पष्टच...

Ajit Pawar : लोकसभेत विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न; पवार स्पष्टच म्हणाले…

Subscribe

भारतीय संविधान दिनानिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या देशातील प्रत्येक घटकासाठी विचार करून ही घटना लिहिली, मात्र लोकसभेत निवडणुकांच्या वेळेस विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.

मुंबई : आज मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण झाले आहेत. या दिनानिमित्त अनेक दिग्गज नेत्यांकडून शहिदांना पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. यावेळी शहिदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. सर्वात प्रथम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या संविधान दिनानिमित्त माध्यामांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे असे संविधान तयार केले आहे. मात्र विरोधकांकडून या घटनेचा लोकसभेत फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. (Ajit Pawar On Mahavikas Aghadi.)

हेही वाचा : Maharashtra Politics : युतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा; आता उत्सुकता नव्या सरकारची

- Advertisement -

राज्यभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला असून, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. आम्हाला संविधानाबाबत अतिशय आदर तसेच अभिमान आहे. मात्र या संविधानाचा वापर राज्यातील विरोधी पक्षांनी स्वत: च्या स्वार्थासाठी केल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच विरोधकांनी राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संविधानाबाबत फेक नॅरेटिव्ह सेट केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्या फेक नॅरेटिव्हचा इतका प्रभाव पाडला की, आमचा लोकसभेमध्ये पराभव झाल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच बाबासाहेबांनी देशातील तळागाळातील लोकांसाठी ही घटना तयार केली आहे. मात्र लोकसभेच्या वेळी संविधानाचा फेक नॅरेटिव्ह सेट करून विरोधकांनी त्याचा गैरवापर केला आहे. तसेच आम्ही सगळे समजावून सांगत होतो, मात्र आमचं कोणीच ऐकलं नाही, असेही ते म्हणाले आहेत. अशाप्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदी फडणवीसच! दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब

- Advertisement -

भारतीय राज्यघटना ही प्रत्येक भारतीयासाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. राज्यघटनेमध्ये मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले. भारताच्या संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -