Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Ajit Pawar : कलेक्टरच्या बदलीचे रेट काय? अजित दादांचा शिंदे सरकारला सवाल

Ajit Pawar : कलेक्टरच्या बदलीचे रेट काय? अजित दादांचा शिंदे सरकारला सवाल

Subscribe

 

मुंबईः जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे रेट काय, असा सवाल करत बदल्या होणं, अधिकाऱ्यांनी परदेशात जाणं आणि  बातम्या येणं हा काही योगायोग आहे का? हा संशोधनाचा विषय आहे, असा टोला विरोधा पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी लगावला. शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांसाठी लाच घेतल्याचा आरोप होत आहे. त्यावरून अजित पवार यांनी सरकारला टोला लगावला.

- Advertisement -

हेही वाचाः…तर मी राजकारण सोडेन; शिंदे गटातील खासदाराच्या आरोपाला अजित पवारांचे प्रत्युत्तर

अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार ठराविक आमदारांनाच आहेत. त्याचे रेटकार्डही आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेतली गेली, असा आरोप अजित पवार यांनी केला. माझे अनेक सनदी अधिकारी मित्र आहेत. अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंधही आहेत. अधिकारी मला खासगीत सांगत असतात. साहेब आमचं नाव घेऊ नका. पण आम्हाला अधिकार असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीनुसारच आदेश काढावेत असे आम्हाला तोंडी सांगितले जाते. त्यातील काही अधिकारी परदेशात गेले आहेत. बदल्या होणं, अधिकाऱ्यांनी परदेशात जाणं आणि त्याच्या बातम्या येणं हा काही योगायोग आहे का हा संशोधनाचा मुद्दा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचाःAjit Pawar: एकेकाच्या कानशिलात लगावीन, पुण्यातील दोन पदाधिकाऱ्यांना दादांनी झापलं

बदल्या करण्याचे अधिकार काही ठराविक आमदारांनाच आहेत. कुठल्या आमदारांनी सांगतिल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या होतात हेही ठरलेलं आहे. बदली करायची की नाही यावर ते चर्चा करतात. मागे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही बदलीचं रेटकार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा रेट किती हेही राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. तसेच कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट ३ लाख रुपये आहे, असं माध्यमांमध्ये छापून आलं आहे. पैसे देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे कसे काम करु शकतात, असा सवालही अजित पवार यांनी केला.

शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक आहे. अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय ही फसवणूक थांबणार नाही. त्यामुळे शासन आपल्या दारी नेलं काय किंवा शासन आणखी कुठं नेलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितलेली व्यथाही अजित पवार यांनी सांगितली. आम्हाला महत्त्वाची पोस्टींग नकोच. पण आमच्याकडून नको ती कामे करुन घेतली जातात. याने वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना खासगीत विचारावं ते सर्व सांगतील, असा दावाही अजित पवार यांनी केला.

‘आमदार काय काय मागतात तुम्हाला सांगता येणार नाही’

आमदार काय काय मागतात हे तुम्हाला सागंता येणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी केले होते. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. अजित पवार म्हणाले, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला हे असा आरोप होतो आहे. तेथे पुण्यात तर दलाल लोकं बसलेलेच आहेत. अधिकारी वर्ग पण दबक्या आवाजात बोलत आहे. या सरकारमध्ये कणखरपणा नाही. पारदर्शकता नाही. भ्रष्टाचार बोकळला आहे. माझ्याकडे पुरावे आले की मी मांडनेच. विधानसभेत आवाज उठवेन.  कर्नाटकात अशाच प्रकारे भ्रष्टाचार वाढला होता. जनतेने सत्ताधाऱ्यांना फेकून दिलं. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे.

 

 

- Advertisment -