घरमहाराष्ट्रAjit Pawar : आमदार काय काय मागतात तुम्हाला सांगता येणार नाही; अधिकाऱ्यांच्या...

Ajit Pawar : आमदार काय काय मागतात तुम्हाला सांगता येणार नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून टोला

Subscribe

 

मुंबईः आमदार काय काय मागतात हे तुम्हाला सागंता येणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी केले. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले.

- Advertisement -

हेही वाचाः“मला त्यांच्या बोलण्याने…”; संजय राऊतांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला हे असा आरोप होतो आहे. तेथे पुण्यात तर दलाल लोकं बसलेलेच आहेत. अधिकारी वर्ग पण दबक्या आवाजात बोलत आहे. या सरकारमध्ये कणखरपणा नाही. पारदर्शकता नाही. भ्रष्टाचार बोकळला आहे. माझ्याकडे पुरावे आले की मी मांडनेच. विधानसभेत आवाज उठवेन.  कर्नाटकात अशाच प्रकारे भ्रष्टाचार वाढला होता. जनतेने सत्ताधाऱ्यांना फेकून दिलं. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचाः“त्याबद्दल मला खेद वाटतो…” अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत नरमले

कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. कांद्याला भाव मिळत नाही. कापसाला भाव मिळत नाही. उत्पादकाला किमान भाव मिळायला हवा. उत्पादन जास्त झाले की निर्यातीवर बंदी आणली जाते. यांची धोरणं बदलतात. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि नाफेड काय करत आहे. ते काय करत नसतील तर आम्हाला आंदालेनच करावे लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

‘मुंबई महापालिका निवडणूक ठाकरेंसोबत’

मुंबईतील लोकांना ठाकरे गटाबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुक एकत्र लढण्याबाबत ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.  जर का आता सर्व्हे केला तर त्यामध्ये शिवसेनेला (ठाकरे गटाला) जागा जास्त दाखवत आहे. मुंबईतल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे. ज्या प्रकारे मधल्या काही काळात राजकीय घटना घडलेल्या होत्या, त्यामधून शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदीचा नाहीये. आमचे कमी आमदार या ठिकाणी निवडून येतात, नगरसेवक ही कमीच निवडून येतात. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना एकत्र सामोरे जाऊ, अशी विनंती केली असल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर सर्वस्वी निर्णय घेतील

प्रकाश आंबेडकर यांची आमच्या पक्षाबाबतची मते हे नेहमीच वेगळी राहिलेली आहेत. हे आज नाहीतर गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आधी देखील निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्याकडून वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस, वंचित आणि राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असे मत होते. परंतु त्यात आम्हाला दुर्दैवाने यश आले नाही. शेवटी प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नेते आहेत आणि त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय बोलावे हे देखील शेवटी त्यांचा निर्णय आहे, असे अजित पवार यांंनी स्पष्ट केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -