अर्थसंकल्प कसा वाचायचा याचं पुस्तक लिहायला हवं होतं; अजित पवारांचा फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मनमोहन सिंग यांनी विकासाची पंचसुत्री सांगणारा अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचे अनुकरण अटलबिहारी वाजपेय यांनी केले. मात्र या अर्थसंकल्पात पंचसुत्री नाही. वर्षभराचे नियोजन नाही. ७५ हजार नोकर भरती करणार होते. कुठे केली नोकर भरती. 

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – अर्थसंकल्प कसा सादर करावा याचे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे. त्यापेक्षा अर्थसंकल्प कसा वाचावा याचे पुस्तक त्यांनी लिहियाला हवे होते, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना अजित पवार म्हणाले, मनमोहन सिंग यांनी विकासाची पंचसुत्री सांगणारा अर्थसंकल्प सादर केला होता. त्याचे अनुकरण अटलबिहारी वाजपेय यांनी केले. मात्र या अर्थसंकल्पात पंचसुत्री नाही. वर्षभराचे नियोजन नाही. शिंदे-फडणवीस सरकार ७५ हजार नोकर भरती करणार होते. कुठे केली नोकर भरती.

कल्याण-डोंबिवलीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी निधी जाहिर केला होता. हा निधी अद्याप त्यांनी दिलेला नाही. महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण नेमके किती पैसे देणार याचा खुलासा यात केलेला नाही. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या स्मारकाचे पुढे काय झाले, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

शिंदे-फडणवीसांच्या अर्थसंकल्पावर टीका करताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात अर्थसंकल्पाची जी पंचसुत्री होती. त्याचे नामांतर करुन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.जो अर्थसंकल्प अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मांडला होता. तो सर्वसमावेशक होता. आताचा अर्थसंकल्प म्हणजे एक जुमला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यात काहीच तरतुद केलेली नाही. जातीयवाद वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. महिलांना न्याय नाही. बेरोजगारांना न्याय नाही. अशा प्रकारे निरस व बेरंग असा हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

जनतेशी सरकारला काहीच देणंघेणं नाही. सरकारकडे कोणतेही उत्पन्नाचे स्त्रोत नाही. त्यांच्याकडे पैसेच नाहीत. तरीही घोषणा करण्यात आलेल्या आहेत. निव्वळ महाराष्ट्राची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही दानवे यांनी सांगितले.

 

हेही वाचा- १४ मार्चला निकाल विरोधात जाणार म्हणून..; अर्थसंकल्पावरून अजित पवारांचा सरकारवर घणाघात

हेही वाचा- अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे; अजित पवारांची खोचक टीका