घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे; अजित पवारांची खोचक टीका

अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे; अजित पवारांची खोचक टीका

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले आणि शब्दांचे फुलोरे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस होता. भरीव निधीची तरतुद एवढीच काय ती घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ठोस असे काही नाही, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यात विविध घोषणा राज्य शासनाच्यावतीने करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर टीका करताना अजित पवार म्हणाले, आम्ही करणार आहोत. देणार आहोत, एवढचं काय ते त्यांनी सांगितले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांना स्वप्नांच्या नगरीत फिरवून आणल्यासारखे आहे. अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ होता. बेरोजगार, उद्योग, शेतीसाठी काय करणार याची तरतूद अर्थसंकल्पात नाही.

- Advertisement -

पंचामृतासारखा कधी न दिसणारा अर्थसंकल्प

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंचसुत्रीचा अर्थसंकल्प आम्ही सादर केला. या सरकारने मात्र पंचामृताचा अर्थसंकल्प सादर केला. आपण कधी पंचामृत बघितलेले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्पही कधीच दिसणार नाही. भविष्याचे कोणतेही नियोजन नसलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

वाणीला आणि कानाला बर वाटवं यासाठी खटाटोप

वाणीला आणि कानाला बरं वाटावं म्हणून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात जाहिर केलेल्या योजनांचे पुढे काय झाले याचे उत्तर अर्थसंकल्पात नाही. महाराष्ट्राचे उत्पन्न किती. आपण घोषणा किती केल्या याचा काहीच विचार केला गेलेला नाही. राज्यातील विमानतळांसाठी केवळ घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात त्यासाठी काय केले जाणार याचे स्पष्ट उत्तर अर्थसंकल्पात देण्यात आलेले नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.

१ एप्रिलला विजेचा झटका

१ एप्रिलला नागरिकांना विजेचा झटका बसणार आहे. कारण १ एप्रिलपासून विजेची मोठी दरवाढ होणार आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -