घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या घराबाहेर अजितदादांचा ठिय्या

शरद पवारांच्या घराबाहेर अजितदादांचा ठिय्या

Subscribe

काका-पुतण्यातील संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुन्हा एकदा हा संघर्ष तोंडदेखला का असेना पण पाहायला मिळाला.

काका-पुतण्यामधील वाद हा महाराष्ट्रात काही नवा नाही. राज्यातील राजकारणात अनेक काका-पुतणे आहेत, ज्यांच्यातून विस्तवही जात नव्हता. मात्र बारामतीमध्ये एक अजबच घटना घडली. एकाच पक्षात असलेल्या काकांच्या घरासमोर त्यांच्या पुतण्याने ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. झाले असे की आज सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. बारामतीत देखील शरद पवार यांच्या माळेगावमधील गोविंदबाग निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलक ठिय्या मांडून बसले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, बारामतीचे आमदार आणि पवारांचे पुतणे खुद्द अजित पवार देखील आंदोलकांसोबत पवारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनाला बसले. नुसतेच बसले नाहीत, तर झेंडे फडकावत, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या….’ अशी घोषणाबाजी देखील केली.
अजितदादांनी दिलेल्या या धक्क्याची चर्चा सध्या सर्वठिकाणी रंगली आहे. ज्या थोरल्या काकांचे बोट धरून अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला, त्याच काकांच्या घरासमोर अजितदादा आज ठिय्या आंदोलनाला बसले. नुसते बसलेच नाही तर त्यांनी यावेळी जोरदार घोषणा बाजी देखील केली.

अजित पवार मराठा आंदोलन
शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करताना अजित पवार

म्हणून अजित पवार काकांच्या घरासमोर बसले

ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या महाराष्ट्र बंदमध्ये नवी मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. बारामतीमध्ये देखील मराठा आंदोलकांनी शरद पवार यांच्या गोविंदबाग या बंगल्यासमोर ठिय्या धरला. यावेळी अजित पवार हे देखील या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. बारामतीमध्ये मराठा आंदोलकांचे गेले काही दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यामुळे आज महाराष्ट्र बंदच्या दिवशी शरद पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करायचे असे आंदोलकांनी ठरवले. त्यानुसार सकाळी साडे नऊ वाजता गोविंदबाग येथे आंदोलक जमले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. नंतर काही वेळाने अजित पवार देखील या ठिय्या आंदोलनात सामील झाले आणि ठाण मांडून बसल्याचे पहायले मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -