घरताज्या घडामोडी...अन् आदित्य ठाकरेंकडून अजितदादांसाठी स्टेअरिंग हातात घेत गाडीचं सारथ्य

…अन् आदित्य ठाकरेंकडून अजितदादांसाठी स्टेअरिंग हातात घेत गाडीचं सारथ्य

Subscribe

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीकडून विकासकामांवर भर देण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी पहाटेपासून आपल्या कामांना सुरुवात करत असतात. अजित पवारांच्या कामांमुळे ते अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. परंतु आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा सकाळीच मुंबईत पाहणी दौरा करताना दिसले. यावेळी चक्क पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या गाडीतून अजितदादांनी प्रवास केला आणि गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरे यांच्याकडे होते. राजकीय वर्तुळात हे पहिलेच उदाहरण नाही. यापूर्वी अजित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळीपासूनच मुंबईत विकासकामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील जवळीक यातून दिसून आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे. सत्तेत आल्यापासून तीन पक्षांचे नेते एकत्र काम करत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यात जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. विधानसभा अधिवेशनादरम्यानसुद्धा या दोन नेत्यांमध्ये संवाद होत होता. तसेच आदित्य ठाकरेंच्या मदतीला अजित पवार धावून आले ते सुद्धा महाराष्ट्राने पाहिले असून यामधून त्यांच्यातील ट्यूनिंग कळले होते. यानंतर आता मुंबईच्या रस्त्यावर दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे.

- Advertisement -

मुंबईतील धोबी तलाव, महालक्ष्मी रेड क्रॉस आणि विकासकामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा सोबत होते. आदित्य ठाकरे- अजित पवार यांनी एकत्रच प्रवास केला. आदित्य ठाकरे गाडी चालवताना दिसले तर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. यापूर्वी अजित पवारांनी मुंबई महनगरपालिका भेटीत आदित्य ठाकरे यांचे कौतुक केलं होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीकडून विकासकामांवर भर देण्यात येत आहे.

- Advertisement -

अजितदादांकडून मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाडीचं सारथ्य केलं होते. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीत बसले त्या गाडीच्या चालकाच्या सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार होते.


हेही वाचा : छत्रपती घराण्यात जन्मः भाग्याची गोष्ट पण लोककल्याणाची सर्वथा जाणीव, संभाजीराजेंची वाढदिवशी भावूक पोस्ट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -