Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAjit Pawar : तुम्ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय का? प्रश्न विचारताच अजितदादा...

Ajit Pawar : तुम्ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय का? प्रश्न विचारताच अजितदादा भडकले; म्हणाले, “अरे बाळा…”

Subscribe

Ajit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. पण, अजितदादा राजीनामा न घेण्यावर ठाम असल्याचं दिसत आहेत.

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि पवनऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड तुरुंगात आहे. यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. पण, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे चिडल्याचे पाहायला मिळाले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्या-त्या काळी ओढावलेल्या परिस्थितीनंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आताही धनंजय मुंडेंच्या भोवताली संशयाचं वार पसरलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आणि विरोधातील आमदारांनी केली आहे. याला धरूनच विचारल्यावर अजितदादांना संतापले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा : परळीत राखेच्या टिप्परनं सरपंचाला चिरडलं, सुरेश धसांनी थेट मालकाचं नाव सांगत केला मोठा आरोप

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, असा प्रश्न विचारल्यावर अजितदादा म्हणाले, “त्यासंदर्भात कितीदा तेच-तेच सांगायचे… त्याप्रकरणातील चौकशीत जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.”

जेव्हा-जेव्हा मंत्र्यांवर राजीनामा झाले, ते चौकशीसाठी बाजू झाले. आता तुम्ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालता का? असा असे विचारल्यावर अजितदादांनी भडकत म्हटलं, “अरे बाळा चौकशीला सामोरे कधी जातात? तुझी चौकशी केव्हा होईल… तुझे नाव आले होईल ना… तुझे नाव नसेल, तर उगच चौकशी करतात का?”

यानंतर पत्रकार अजितदादांना वीजबिल माफीसंदर्भात प्रश्न विचारत होते. पण, चिडलेले अजितदादांना न थांबता निघून गेले.

हेही वाचा : “कामासाठी 10 तासच पुरेसे, पण…”, सुब्रमण्यन यांच्या 90 तासांच्या विधानावर आनंद महिद्रांची प्रतिक्रिया