Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAjit Pawar : पुण्यात 'NCP'च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले;...

Ajit Pawar : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण…

Subscribe

Baburao Chandore : पुण्यातील अजितदादांच्या पक्षातील नेते असलेले बाबुराव चांदेरे यांनी एका व्यक्तीला उचलून आपटले आहे. यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय, पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी शनिवारी ( 25 जानेवारी ) एका व्यक्तीला मारहाण केल्याचं समोर आले होते. याप्रकरणी आता सदरील व्यक्तीच्या तक्रारीनंतर बाबुराव चांदोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यासह अजितदादांनी देखील चांदेरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत सुनावले आहे.

बाबुराव चांदोरे हे अजितदादांचे निकटवर्तीय आणि महापालिकेच माजी स्थायी समिती अध्यक्ष होते. मात्र, शनिवारी चांदेरे यांनी विजय रौंदळ या व्यक्तीला मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता रौंदळ यांनी चांदेरे यांच्याविरोधात बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : …तर फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील; चंद्रकांतदादांनी स्पष्टच बोलून टाकलं

नेमकं झाले काय होते?

पुण्यातील सूसगाव येथे बाबुराव चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून रौदळ यांना मारहाण केली. रौदळ व्हिडिओ काढत असताना चांदेरे अचानक तिथे आले, त्यांनी रौदळ यांना गाडीत बस बस म्हटलं. रौदळ यांनी नाही ऐकल्यावर त्यांना उचलून आपटले. यात रौंदळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

चांदेरेंच्या प्रकारावर अजितदादांही संतापले…

चांदेरेंनी केलेल्या मारहाणीबद्दल विचारल्यावर अजितदादांनी पक्षात असा प्रकार खपवून घेणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. “मी तो व्हिडिओ पाहिला. हे अतिशय चुकीचं आहे. कोणालाही कायदा हातात घेता येत नाही. तो अधिकार आपण कोणालाही दिला नाही. त्यामुळे मी चांदेरेला फोन केला होता. मात्र, त्याने फोन डायव्हर्ट केला होता. त्याच्या मुलाशी मी बोललो. मुलगा म्हणाला, की ते घरी नाहीत. मी मुलाला म्हटलं की, जे काही क्लीपमध्ये बघितलं, ते मला अजिबात आवडले नाही. अशा पद्धतीनं काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेले मी खपवून घेणार नाही. मला त्याला ( बाबुराव चांदेरे ) बोलवून जाब विचारायचा आहे की, याच्या पाठीमागचे कारण काय?” असं अजितदादांनी म्हटलं.

हेही वाचा : गुलाबराव पाटील यांचा मोठा खुलासा; म्हणाले, एकनाथ शिंदेंनी…