घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र सदनाच्या 'त्या' प्रकारावरुन अजित पवार मुख्यमंत्र्यांवर संतापले; म्हणाले...

महाराष्ट्र सदनाच्या ‘त्या’ प्रकारावरुन अजित पवार मुख्यमंत्र्यांवर संतापले; म्हणाले…

Subscribe

अजित पवार म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून राज्यपाल, सरकारमधील मंत्री या सर्वांनी महापुरुषांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. त्या विरोधात आम्ही सर्वांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारण्याचं काम केलं.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीकरता महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या प्रकारानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया देत राज्य सरकारला सुनावलं आहे.  ( Ajit Pawar angry with Chief Minister eknath Shinde over Ahilyabai Holakar And savitribai Phule photo of Delhi Maharashtra Sadan )

अजित पवार म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून राज्यपाल, सरकारमधील मंत्री या सर्वांनी महापुरुषांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. त्या विरोधात आम्ही सर्वांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारण्याचं काम केलं. पण काल दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यक्रमादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा हटवण्यात आला. ते पुतळे हटवण्याच कोणतंही कारण नव्हतं. या अशा घटना घडता कामा नये. मला एक प्रश्न पडतोय की, या घटना जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का? नजर चुकीने घडले का? त्यामुळे मी त्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि राज्यातील जनता या घटनेची निश्चित नोंद घेईल. अशा शब्दांत शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली.

- Advertisement -

जयंत पाटलांनी व्यक्त केली नाराजी 

कर्तृत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.

- Advertisement -

( हेही वाचा: सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवणे ही चिंतेची बाब- जयंत पाटील )

या दोन कर्तबगार महिला, त्या दोघींनी देशासमोर आदर्श ठेवला आहे. आज महिला शिकल्या याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर पुण्यकर्म केले आहे. या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणे याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेलच शिवाय देशातील जनताही करेल असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -