Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मानाच्या १० पालख्यांना बसमधून वारीची परवानगी, देहू-आळंदीसाठी १०० वारकऱ्यांना परवानगी - अजित...

मानाच्या १० पालख्यांना बसमधून वारीची परवानगी, देहू-आळंदीसाठी १०० वारकऱ्यांना परवानगी – अजित पवार

Related Story

- Advertisement -

आषाढी वारी पालखीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या बैठकीत बरीच चर्चा झाली. आषाढी वारीसाठी आग्रही मागणी होती. यानंतर काल मंत्रिमंडळ बैठकीत सर्वमानाच्या १० पालखी सोहळ्यांना परवानगी द्यायचा निर्णय झाला आहे. परवानगीमध्ये साधाराण मागील वर्षी कोरोनाच्या संकटात वारकरी संप्रदायासह सर्व मान्यवरांना आवाहन केले होते. यावर्षी मानाच्या १० पालखी सोहळ्यांना आषाढी वारीच्या प्रस्थान करण्यासाठी परवानगी दिली होती. मागील वर्षी २० वाराकाऱ्यांना परवानगी दिली होती मात्र यावर्षी देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी १०० वारकाऱ्यांना परवानगी दिली होती. उर्वरित ८ पालखी सोहळ्यांना ५० वारकाऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

१० पालख्यांसाठी २० बस

या वारकाऱ्यांना मान्यता असेल परंतु पालखी घेऊन जाण्यासाठी परवानगी नसेल मंदिरात वारकाऱ्यांना जाण्याची परवानगी आहे. परंतु पायी वारी सोहळ्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. वारकाऱ्यांसाठी १० पालखी वारीकरता प्रत्येकी २ बस म्हणजे २० बस उपलब्ध करुन दिल्या जातील.

- Advertisement -

या पालखी सोहळ्याचे पादुका बसमधून नेण्यात येणार आहे. मानाच्या पालखी सोहळ्याचे पंढरपुरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेला प्रस्थान करण्यात येणार आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी करण्याबाबत विशेष वाहनाने वाखणी येथे वारकरी पोहचल्यावर तिथून दीड किमी अंतर प्राथिनिधीक स्वरुपात पंढरपुरकडे पायी वारीला परवानगी देण्यात आली आहे. नंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्याबाबत कोविडचा प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मंदिर विभागाकडून कोणताही निर्णय आलेला नाही त्यामुळे शासन स्तरावरील निर्णय लागू करण्यात येईल.

पालखी सोहळ्याचे गतवर्षी प्रमाणे प्रस्थान होणार आहे. विठ्ठलास संतांच्या भेटी प्रत्येक पालखीसह ५भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. श्रींच्या २४ तास दर्शनाबाबत श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद राहील. संत भानुदास पुण्यतिथी २+२ असे एकुण ४ व्यक्तींच्या उपस्थित साध्या पद्धतीत साजरा करण्याची परवानगी, श्री विठ्ठलाची पादुका मिरवणुक १+ १५ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्याची परवानगी आहे. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधांसह परवानगी असणार आहे. तसेच इतर मिरवणूका आणि संतांच्या भेटींसाठी निर्बंधांसह साजरे करण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

१० मानाच्या पालख्या

श्री. संत एकनाथ महाराज संस्थान पैठण ( औरंगाबाद )
श्री. संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर (नाशिक)
श्री. चांगावटेश्वर देवस्थान सासवड (पुणे)
श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड (पुणे)
श्री. संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर (जळगाव)
श्री. विठ्ठल रुक्माई सौठण्यपुर (अमरावती)
श्री. संत तुकाराम महाराज संस्थान ( पुणे)
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी
श्री. संत नामदेव महाराज संस्थान पंढरपुर (सोलापुर)
श्री. संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर ( अहमदनगर)

- Advertisement -