पुण्यातील पर्यटनस्थळे पुर्ण क्षमतेने सुरु, हॉटेल ११ पर्यंत सुरु राहणार, अजित पवारांची घोषणा

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सिनेमागृह आणि नाट्यगृह हे २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला

foundation a Union of Ministers under the chairmanship of Ajit Pawar for rectify the error in GST
पुण्यातील पर्यटनस्थळे पुर्ण क्षमतेने सुरु, हॉटेल ११ पर्यंत सुरु राहणार, अजित पवारांची घोषणा

कोरोना काळात मागील दीड वर्षांनी बंद असलेले ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यनट स्थळे येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच पुण्यातील हॉटेल सध्या १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी होती ती वाढवून रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. महाविद्यालयांना सुरु करण्याची परावानगी देण्यात आली आहे परंतु फक्त दोन लसींचा डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची जबाबदारी संस्थेवर आणि महाविद्यालयावर असेल असे अझित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली आहे. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करुन काही सुविधांना परवानगी देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. पुण्यातील पर्यटन स्थळे सुरु करण्याबाबतचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच राज्यभरात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आले आहेत. पुण्यातही महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी सूचना अजित पवार यांनी दिली आहे. त्या त्या संस्थेवर विद्यार्थ्यांची जाबाबदरी असेल असेही अजित पवारांनी म्हटलं आहे.

पर्यटनस्थळे सुरु होणार

पुण्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यटन स्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासून पर्यटनस्थळे पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. तसेच पुण्यातील हॉटेल्सना आता रात्री ११ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील शहरी भागात ट्रेनिंग सेंटर्स आहेत. ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून अल्पवयीन मुलांना वगळता मोठ्यांना दोन लसी घेतलेल्यांना परवानगी देण्यात यावी असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नाट्यगृह २२ ऑक्टोबरपासून सुरु

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सिनेमागृह आणि नाट्यगृह हे २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुढील आठवड्यातील आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. या आठवड्यातील कोरोना परिस्थितीचा पुढील आठवड्यात आढावा घेण्यात येईल यामध्ये कोरोना लसीकरण, कोरोना प्रादुर्भाव आणि कोरोना टक्केवारी यावरुन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लसीकरणात पुणे दुसऱ्या क्रमांकावर

कोरोना लसीकरणात महाराष्ट्रात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात पहिल्या स्थानी मुंबई आणि दुसऱ्या क्रमांकावर पुणे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. पुण्यात एकूण १ कोटींच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात IT च्या दुसऱ्या दिवशीही धाडी सुरु, १ हजार ५० कोटींचे आढळले संशयास्पद व्यवहार