अजित पवार हे बंड करत राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली. दोन्ही गटांनी आपले प्रदेशाध्यक्ष,व्हिप आणि अध्यक्षांची नावं घोषित केली. त्यानंतर आता अजित पवार यांनी नवी खेळी खेळली आहे. शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करत अजित पवार गटानं विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. (Ajit pawar appeal against sharad pawar Ajit Pawar group has filed a petition with the Speaker of the Legislature demanding that the MLAs of the Sharad Pawar group should be disqualified for doing anti-party activities)
विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणआऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचं सांगत अजित पवार गटानं ही मागणी केली आहे.
पक्षविरोधी कृत्य करणाऱ्या राष्ट्रावादीच्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मूळ राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटानं विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हं निर्माण झाले आहे. अजितदादांच्या गटानं ही नवी खेळी खेळल्यानं आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटात राजकारण तापण्याची शक्यता असून यावर शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचला असून त्याबाबत 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. 6 तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणक आयोगासमोर मांडणार आहेत.
यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटानं केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याचं सांगितलं जात आहे.
(हेही वाचा: अपूर्ण सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश )