घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मंत्र्यावर भरोसा नाय काय? अजित पवार

मुख्यमंत्री महोदय तुम्हाला मंत्र्यावर भरोसा नाय काय? अजित पवार

Subscribe

नागपूरमध्ये पहिल्यांदाच होत असलेले पावसाळी अधिवेशन घेतल्यामुळे सरकार सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी विरोधकांच्या निशाण्यावर आहे. आधीच गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज वाय गेले असताना आज विधानसभेच्या कामकाज पत्रिकेवर भरमसाठ काम दाखवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते चांगलेच तापले. यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच फैलावर घेत म्हटले की, मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडे सध्या बरीच कामं आहेत. अधिवेशनाखेरीज तुम्हाला दिल्लीलाही जायचं असतं. तिथलंही काम तुमच्या डोक्यावर असतं. तुमची ओढाताण होत असेल तर तुम्ही सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील किंवा विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी का सोपवत नाहीत? तुम्हाला या मंत्र्यावर भरोसा नाही का? अशी कोपरखळी मारत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाज रेटण्याच्या पद्धतीवर टीका केली.

विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरु असताना अजित पवार यांनी आजच्या कामकाज पत्रिकेत दहा विधेयके असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आघाडी सरकार असताना आम्ही विरोधकांचेही प्रस्ताव घ्यायचो. मात्र यावेळी मागील आठवड्यातील विरोधकांचे दोन प्रस्ताव आणि सत्ताधाऱ्यांचा एक प्रस्ताव आजच्या कामकाजात दाखवला आहे. त्यात या आठवड्यात अंतिम आठवड्याचा प्रस्ताव येणार आहे. त्यामुळे हे प्रस्ताव लवकर घेण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

मात्र प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनाच लक्ष द्यावे लागत असल्याने त्यांच्यावर मोठा ताण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही कामं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे द्यायला हवेत. मंत्र्यांनाही काही काम मिळेल आणि मुख्यमंत्र्यांचाही कामाचा ताण हलका होईल, अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी विधानसभेत केली.

अजित पवार यांच्या मिश्किल टोला मारल्यानंतर मुख्यमंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रयत्न करत होते. मात्र अजित पवारांच्या वाक्चातुर्यासमोर त्यांचे काही चालले नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र अजितदादांच्या कोणत्याही मुद्यावर उत्तर देण्यापेक्षा शांत राहणेच पसंत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -