घरताज्या घडामोडीअन् क्वारंटाईन असलेल्या अजित पवारांनीही लावली खडसेंच्या पक्षप्रवेशाला उपस्थिती

अन् क्वारंटाईन असलेल्या अजित पवारांनीही लावली खडसेंच्या पक्षप्रवेशाला उपस्थिती

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे आज एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थित नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी का मारली असावी? यावर चर्चा होत होती. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे सध्या घरीच क्वारंटाईन असलेल्या अजित पवारांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यामातून खडसेंच्या पक्षप्रवेशाला हजेरी लावली. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर अजितदादांनी एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला.

आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश ठरला होता. मात्र राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. याआधी देखील अजित पवारांनी पक्षांच्या काही महत्त्वाच्या बैठकांना, कार्यक्रमांना दांडी मारलेली आहे. त्यामुळे नेहमीच अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा होते. तशी आजही होत होती. मात्र सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारामुळे अजित पवारांनाही आपली उपस्थिती लावता आली.

- Advertisement -

शरद पवारांना उशीर झाल्यामुळे रंगला गप्पांचा फड

एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम दुपारी २ वाजता नियोजित होता. मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तब्बल १ तास उशीरा आले. त्यामुळे खडसेंसहीत सर्वच नेते ताटकळत वाट बघत बसले होते. अशातच सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना व्हिडिओ कॉल लावल्यानंतर खडसेसहीत इतर नेत्यांनाही अजित पवारांशी गप्पा मारता आल्या.

सुप्रिया सुळेंच्या व्हिडिओ कॉलमुळे जळगावच्या आठवणींना उजाळा

टेक्नो सॅव्ही असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच सोशल मीडिया, नवे तंत्रज्ञानाचा वापर करतात. याआधी विरोधात असताना त्यांनी जळगाव मधील जामनेरच्या सभेत शरद पवारांना व्हिडिओ कॉल लावून सभेत व्हर्चुअली आणलं होतं. जामनेर हा गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. तरिही या सभेला तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे ही गर्दी मुंबईत असलेल्या पवार यांना दाखविण्याचा मोह सुप्रिया सुळे यांना झाला. या व्हिडिओ कॉलची चर्चाही त्यावेळी चांगलीच झाली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -