राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान बारामतीत दाखल होताच, त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवारांचं पृष्पवृष्टीमध्ये आणि ढोल-ताशांच्या गजरात अगदी जोरदार स्वागत होत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अजित पवार यांनी इथे एकहाती वर्चस्व ठेवलेलं आहे. अजित पवार यांचा हा बालेकिल्ला आहे. (Ajit Pawar Baramati Daura Deputy Chief Minister Ajit Pawar received a warm welcome in Baramati)
2 जुलैला अजित पवार हे राष्ट्रवादीमधून एक गट घेऊन बाहेर पडले. त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्तेत जाऊन बसले. त्यानंतर ते बारामतीत गेले नव्हते. आता त्यांचा बंडानंतरचा हा पहिलाच बारामती दौरा आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष या दौऱ्याकडे असताना, अजित पवार यांचं त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. प्रचंड मोठा हार, 10 जेसीपींमधून पुष्पवृष्टी, हजारो किलो फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजरातून अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड येथे अनेक विकास काम करण्यात आलीत.
बारामतीत आज सायंकाळीअजित पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे. अजित पवार समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. सुपे येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनाने अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची सुरूवात होणार आहे. त्यानंतर ते मोरगावच्या मयूरेश्वरला अभिषेक करणार आहेत. मयूरेश्वरच्या दर्शनानंतर ते माळेगावच्या पोलीस चौकीचं उद्घाटन करतील. बारामती शहरात त्यांची उघड्यी जीपमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शारदा प्रांगणात सायंकाळी त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे.
( हेही वाचा: अजित पवारांचा निर्णय विकासासाठी, ‘इंडिया’ आघाडीनेही घेतली दखल; सुनील तटकरेंचा हल्लाबोल )