घर महाराष्ट्र पुणे फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने आम्ही काम करत आहोत - अजित पवार

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने आम्ही काम करत आहोत – अजित पवार

Subscribe

अजित पवार यांच्यावर जेसीबीमधून फुलं उधळण्यात आली. अजित पवारांच्या स्वागताला चांगलीच गर्दी झाली होती. तब्बल 65 दिवसांनंतर अजित पवार मतदार संघात आले. यावेळी त्यांनी भाषण करताना आपण फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने काम करत असल्याचं सांगितलं. तसंच, बारामतीत यायला इतका वेळ का लागला. याचही कारण सांगितलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान बारामतीत दाखल होताच त्यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बारामती दौरा आहे. बारामतीत अजित पवार यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांच्यावर जेसीबीमधून फुलं उधळण्यात आली. अजित पवारांच्या स्वागताला चांगलीच गर्दी झाली होती. तब्बल 65 दिवसांनंतर अजित पवार मतदार संघात आले. यावेळी त्यांनी भाषण करताना आपण फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने काम करत असल्याचं सांगितलं. तसंच, बारामतीत यायला इतका वेळ का लागला. याचही कारण सांगितलं. (Ajit Pawar Baramati Daura We are working with the thought of Phule Shahu Ambedkar)

बारामतीत अजित पवार म्हणाले की, आज मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळे आहे. बारामतीकरांनी माझ्यावर अफाट प्रेम केलं. आज जे माझं स्वागत झालं आहे त्याचा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. अजित पवार यांना आज बारामतीकरांकडून नागरी सत्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी पुणे – नगर – नाशिक रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन दिलं आहे.

- Advertisement -

अजित पवार पुढे म्हणाले की, मी कामात रममाण होणारा कार्यकर्ता आहे. मला काम करायला आवडतं. मी जातीचा-पातीचा, नात्याचा-गोत्याचा विचार केला नाही, शेवटच्या घटकालाही वाटलं पाहिजे ही व्यक्ती आपल्यासाठीही काम करते, अनेकवेळा पद भोगत असताना ते लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी कामं केली आहेत, असं अजित पवार म्हणाले.

तसंच, विकासकामं करताना कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. भावना असते, श्रद्धा असते, पण नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागतो. लोक टीका करतात, पण नव्या पिढीला माहित आहे, हे सर्व बारामतींकरांसाठी मी करतो, असंही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

(हेही वाचा: आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना…; माजी मुख्यमंत्र्यांचे सरकारवर टीकास्त्र )

‘मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही

महाराष्ट्रातील एकाही घटकाला असुरक्षित वाटू नये, राज्यात कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही, बारामतीत येताना पिकं सुकलेली दिसली, त्यासाठी राज्य सरकार योग्य निर्णय घेणार, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही,सत्ता येत असते, जात असते, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संकटात लोकांना आधार द्यावा लागतो, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मांडणार,राज्यात पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक, चांगल्या पावसासाठी मयूरेश्वराला साकडं घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -