घरताज्या घडामोडीअजित पवारांशी संबंधित ४ मालमत्ता जप्त, किरीट सोमय्यांचे ट्विट, मार्केट व्हॅल्यू काय?

अजित पवारांशी संबंधित ४ मालमत्ता जप्त, किरीट सोमय्यांचे ट्विट, मार्केट व्हॅल्यू काय?

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडीमार्फतच्या अटकेच्या कारवाईला काही तास उलटत नाहीत, तोच आयकर विभागाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणखी एक झटका दिला आहे. आयकर विभागाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या १ हजार कोटी किंमतीच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीस काढण्यात आली आहे. बेहिशोबी पैसे ट्रान्सफर केल्याबाबतचे आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला असतानाच, त्यापाठोपाठच आता आयटी विभागाकडून नोटीसही आली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात झालेली ही दुसरी कारवाई असून आता सत्तासंघर्षाची अखेरची लढाई भाजपने सुरू केल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान किरीट सोमय्यांनी अजित पवारांच्या ४ मालमत्तांची यादीच ट्विट केली आहे.

- Advertisement -

अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता या तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याचे आदेश आयकर विभागाच्या नोटीशीद्वारे देण्यात आले आहेत. त्यामध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा समावेश आहे. त्याशिवाय दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचे निर्मल बिल्डिंगचे कार्यालय, गोव्यातील रिसॉर्ट अशा एकुण १ हजार कोटींच्या मार्केट व्हॅल्यूएशन असलेल्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात येत असल्याची नोटीस ईडीद्वारे काढण्यात आली आहे.

आयकर विभागाने याआधीच जरंडेश्वर सहकारी कारखाना जप्त केला आहे. या कारखान्याचे बाजारमूल्य हे ६०० कोटी रूपये आहे. तर मुंबईतील निर्मल बिल्डिंगमधील कार्यालयाची किंमत ही २५ कोटी रूपये आहे. दक्षिण दिल्लीत असलेला फ्लॅट हा २० कोटी रूपये अंदाजे किंमतीचा आहे. तर गोव्यातील निलय रिसॉर्टचे बाजारमूल्य अडीचशे कोटी रूपये इतके आहे. हे रिसॉर्ट अजित पवारांच्या मालकीचे असल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. अजित पवारांच्या नावे असलेले महाराष्ट्रातील २७ ठिकाणचे भूखंडही या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. या सगळ्या भूकंपाडे बाजारमूल्य हे ५०० कोटी रूपये इतके आहे. आयकर विभागाने दावा केल्यानुसार १ हजार कोटींहून अदिक बाजारूमूल्य असलेल्या मालमत्तांसाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

अजित पवारांशी संबंधित या बेनामी अशा मालमत्ता असून त्यांच्या कुटूंबीयांच्या नावे यापैकी अनेक मालमत्ता आहेत. या मालमत्तांची खरेदी चुकीच्या पद्धतीने झाली असून बेनामी मालमत्ता कायद्याची अंमलबजावणी या प्रकरणी होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात आयकर विभागाने अजित पवारांच्या कुटूंबीयांच्या तसेच अजित पवारांच्या बहिणीच्या घरांच्या ठिकाणी छापे टाकले होते. अजित पवारांनीही या छाप्यांबाबत नाराजी बोलून दाखवली होती. गेल्या ३५ ते ४० वर्षांपूर्वी माझ्या बहिणींचा विवाह झाला आहे. पण त्यांच्या घरांच्या ठिकाणी आता छापे पडले. अजित पवारांशी संबंधित म्हणून हे छापे टाकण्यात आले. अतिशय चुकीच्या पद्धतीने यंत्रणेचा वापर होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सत्तेचा दुरूपयोग केला जात असल्याची टीका केली होती.

गेल्या महिन्यात आयटी विभागाने केलल्या छापेमारीत मुंबईतील दोन रिअल इस्टेट बिझनेस ग्रुप्सच्या मालमत्तांवरही छापेमारी करण्यात आली होती. त्यामध्ये डीबी रिअॅलिटी आणि शिवालिक ग्रुपचा समावेश होता. काही व्यक्ती आणि संबंधितांचा अजित पवारांशी आणि त्यांचा मुलगा पार्थ पवारशी संबंध आढळल्यानेच ही कारवाई झाली होती.


हेही वाचा – देशमुखांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांनी महाविआ सरकारला लगावला टोला

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -