घरताज्या घडामोडीBUDGET 2020 : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

BUDGET 2020 : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

Subscribe

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडीच्या सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा पहिल्यांदाच उल्लेख केला. त्यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या आणि २ लाखांपेक्षा जास्त कर्ज रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्त २०१९ – २ लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे २ लाखांपर्यंतचा लाभ देण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम जमा केल्यानंतर सरकारकडून उर्वरीत २ लाखांची रक्कम परत देण्यात येईल’, अशी घोषणा यावेळी अजित पवारांनी केली. त्यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जाच्या रकमेची परतफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा देखील अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना केली.

कर्जमाफीसाठी २२ हजार कोटींची तरतूद

दरम्यान, यावेळी सध्या सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती दिली. या योजनेसाठी सरकारकडून एकूण २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातली ९ हजार ३५ कोटींची रक्कम याआधीच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. त्यासोबतच, उर्वरीत रक्कम लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये येत्या खरीप हंगामाच्या आधी जमा करणार असल्याची देखील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -