पाहणी दौऱ्यात अजित पवार धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले, काय आहे प्रकरण जाणून घ्या

तराफ्यावर इंजिनक्षमतेच्या अधिक वजन झाल्यामुळे तराफा बंद पडला आणि अजित पवार मध्येच अडकले.

ajit pawar boat stuck in mid water of kasarsai dam during inspection tour
पाहणी दौऱ्यात अजित पवार धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले, काय आहे प्रकरण जाणून घ्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटेपासूनच काम सुरु करुन राज्यातील विकासकामे आणि लोकहिताच्या कामांचा आढावा घेत असतात. स्पष्ट वक्तशीरपणा आणि वेळ न पाहता काम करणे हे अजित पवारांचे वैशिष्ट्यचं आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अजित पवार पुण्याच्या मावळ तालुक्यात असलेल्या कासरसाई धरणातील मस्त्सव्यवसायाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. पाहणी करण्यासाठी अजित पवार तराफ्यावर सवार होऊन धरणाच्या मधोमध गेले परंतु अचानक त्या तराफ्याचे इंजिन बंद पडल्यामुळे अजित पवार काही काळ मधोमधच अडकले होते. यावेळी दुसरा तराफ्याला पाचारण करुन अजित पवारांचा पाहणी दौरा पुर्ण करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कासरसाई धरणातील मत्स्यव्यवसायाची पाहणी केली. सकाळी ७ वाजता अजित पवार मस्त्यवव्यवसायाचा आढावा घेण्यासाठी धरणक्षेत्रात उपस्थित राहिले होते. अजित पवारांना अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आला आहे. त्यामुळे तिथे पोहचण्यासाठी तराफा आणि बोटीचा वापर करण्यात येणार आहे. यावर अजित पवारांनी काही मोजक्या मंडळींना घेऊन जाऊ असे म्हटलं होते.

धरणात पाहणी करण्यासाठी तराफा निवडण्यात आला त्या तराफ्यावर इंजिनक्षमतेच्या अधिक वजन झाल्यामुळे तराफा बंद पडला आणि अजित पवार मध्येच अडकले. त्यानंतर दुसऱ्या तराफ्यातून अजित पवारांचा दौरा पुर्ण केला. दौऱ्यानंतर अजित पवारांनी मात्र आपल्या शैलित सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आजही छापेमारी

जरंडेश्वर कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधीत असलेल्यांच्या कारखाना संचालक आणि नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या सीईट्री कार्यालयावरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापेमारी केली. तर शुक्रवारीसुद्धा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा छापेमारी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या भगिणींच्याही घरी आणि कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान राजकारणापोटी माझ्या संबंधीत असलेल्या लोकांच्या घरी छापेमारी करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.


हेही वाचा : UK : भारताचा आक्रमक पवित्रा, यूके प्रवासात क्वारंटाईनची १० दिवसांची अट शिथील