Eco friendly bappa Competition
घर दिवाळी 2022 अजितदादांचे 8 बहिणींनी केलं औक्षण, सुप्रियाताईंना दिली ओवाळणी

अजितदादांचे 8 बहिणींनी केलं औक्षण, सुप्रियाताईंना दिली ओवाळणी

Subscribe

भाऊबीजनिमित्त दरवर्षीप्रमाणे पवार कुटुंबिय बारामतीमध्ये एकत्र आले होते. पवार कुटुंबियांच्या भाऊबीजची नेहमीच चर्चा होत असते यंदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह एकूण 8 बहिणींनी अजित पवार यांचे औक्षण केले. मात्र अजित पवार यांनी केवळ सुप्रियाताईंना ओवाळणी दिली आहे. अजितदादांच्या भाऊबीजची व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमी समाजकारणात व्यस्त असतात. पवार कुटुंबिय राज्याच्या राजकारणात सक्रिय असतं. परंतु सणाच्या निमित्त वेळात वेळ काढून ते एकत्र येत असतात. कोरोना काळाच्या नंतर ही पहिलीच दिवाळी असल्याने यंदाची दिवाळी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना ओवाळनी दिली असून सगळ्यांनी वाटून घ्या असेही सांगितले.

- Advertisement -

यंदा योगायोगाने भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी असल्यामुळे पवार कुटुंबियातील आनंद द्विगुणीत झाला असल्याचे पाहायला मिळाले. भाऊबीज आणि पाडव्याचे सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळ अजित पवारांनी आपल्या फेसबुकपेजवर सण साजरे करतानाची व्हिडीओ शेअर केली आहे.

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पेजवर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी त्यांचे औक्षण करताना दिसत आहेत. यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांचे पती सदानंद सुळे यांना पाडव्यानिमित्त ओवाळले.


हेही वाचा : दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -