घरमहाराष्ट्रपुणेMaharashtra Politics : पुण्यातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच, अजित पवारांचा दावा

Maharashtra Politics : पुण्यातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीचीच, अजित पवारांचा दावा

Subscribe

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण आता या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरबूर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण आता या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये कुरबूर सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाने या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असतानाच आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुणे लोकसभेच्या जागेबाबतची माहिती दिली. तर पुण्याची सद्यस्थिती पाहून, महाविकास आघाडीत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, अशा पक्षाला ती जागा देण्यात यावी, असे प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले. (Ajit Pawar claims the Lok Sabha seat in Pune belongs to NCP)

हेही वाचा – नवीन संसद भवन उद्घाटन महासोहळा : PM मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले सेंगोलचे महत्त्व

- Advertisement -

पुण्याच्या जागेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथं जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरकडे जरी अशीच उलट परिस्थिती असेल. तेव्हाही असंच घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी, असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तर काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही, असा खोचक टोला लगावत अजित पवारांनी काँग्रेसला डिवचले आहे. तसेच, आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील. आज काँग्रेसने कितीही काहीही म्हटलं तरी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पुण्याच्या जागेवरून कोणताही वाद नाही, असेही यावेळी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत म्हंटले की, 40 लोकं त्यांच्यासोबत गेल्याने सगळ्याच पक्षातील लोक त्यांच्यासोबत आहेत, असे होत नाही. सत्ताधाऱ्यांना आमच्या फुटीबाबतचे स्वप्न पडत असतील तर त्यांना ते पडू द्या, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -