Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र विनाशकाले विपरित बुद्धी, पडळकरांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

विनाशकाले विपरित बुद्धी, पडळकरांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

ज्याचं डिपॉझिट जप्त केलं जातं त्यांना काय एवढं महत्त्व द्यायचं

Related Story

- Advertisement -

पंढरपुरमधील भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. पडळकरांची विनाशकाले विपरिच बुद्धी आहे. ज्याचं डिपॉजिट जप्त होतं त्यांची काय दखल घ्यायची त्यामुळे त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती.

पडळकरांनी काय टीका केली?

अखंड भारताचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावर गोपीचंद पडळकर यांनी आक्षेप घेत शरद पवारांवर टीका केली की, या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास आमचा विरोध नाही परंतु एखाद्या भ्रष्टाचारी माणसाचे हात या पुतळ्याला लागू नये. तसेत भ्रष्टाचारी आणि वाईट प्रवृत्तीच्या माणसाच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे म्हणजे आहिल्या देवींचा अपमान करण्यासारखे आहे. असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

अजित पवारांची प्रतिक्रिया

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारले, यावर अजित पवार प्रत्युत्तरात म्हटले की, गोपिचंद पडळकरांच्या टीकेला विनाशकाले विपरित बुद्दी म्हणतात. ज्याचं डिपॉझिट जप्त केलं जातं त्यांना काय एवढं महत्त्व द्यायचं, उभ राहिल्यावर लोकांनी ज्यांना नाकारले त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -