माझ्याशी संबंध म्हणून यंत्रणांच्या धाडी हे खालच्या पातळीचं राजकारण – अजित पवार

Deputy CM Ajit Pawar
माझ्याशी संबंध म्हणून यंत्रणांच्या धाडी हे खालच्या पातळीचं राजकारण - अजित पवार

निकटवर्तीयांच्या कारखाना आणि संचालकांच्या घरांवर झालेल्या संचालकांच्या धाडींसंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माझ्याशी संबंध आहे म्हणून यंत्रणांच्या धाडी टाकणं खालच्या पातळीचं राजकारण असल्याची टीका केली. (Income Tax Raid) फक्त माझे नातेवाईक असल्यामुळे धाडसत्र सुरु असल्यानं याचं वाईट वाटतंय, असं अजित पवार म्हणाले. गुरुवारी सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टीकास्त्र डागलं आहे.

आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. जर आयकर विभागाला शंका आली तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित कारखान्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. आम्ही दरवर्षी कर भरतो. मी स्वत: राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळे आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे कर कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहित आहे. त्यामुळे माझ्या कंपन्या तसंच माझ्याशी संबंधित अनेक कंपन्या वेळेवर कर भरतात. पण आता आयकरी विभागाने राजकीय हेतूने धाड टाकली की त्यांना काही इतर माहिती पाहिजे होती हे आयकर विभागच सांगू शकतील, असं अजित पवार म्हणाले.

माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

आयकर विभागाने अजित पवार यांच्या बहिणींच्या मालमत्तांवर छापे मारले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. काहीही संबंध नसताना त्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा – माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का? अजित पवारांचा संतप्त सवाल