घरताज्या घडामोडी'केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये'

‘केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये’

Subscribe

'शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या सोडवायला हव्यात, केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये', असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे.

केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकर्‍यांची एकच रास्त मागणी आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता इतर राज्यांकडूनही पाठिंबा मिळत आहे. परंतु, अद्याप या मागणीवर केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमारेषांवर गेल्या महिन्याहून अधिक काळ शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरु असून आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या सोडवायला हव्यात. केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये’, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“ज्यावेळी देशातल्या किंवा राज्यातल्या व्यक्ती आंदोलन करतात. त्यावेळी ते एकाऐकी आंदोलन करत नाही. तर ते पहिल्यांदा आपल्या मागण्या सांगतात की, आमच्या या मागण्या आहेत. आमची ही भूमिका आहे. जर ती मागणी व्यवहाराला धरुन असली तर केंद्रामध्ये जी व्यक्ती काम करत असेल त्या व्यक्तींनी त्या गोष्टीकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज जे दिल्लीत आंदोलन चिघळले आहे, ते आजचे आंदोलन नाही तर अनेक दिवसांपासून ते आंदोलन सुरु आहे”.

- Advertisement -

बैठका झाल्या निष्फळ

“नव्या कृषी कायद्याविरोधात आतापर्यंत १० ते १२ बैठका झाल्या. पण, या सर्व बैठका निष्फळ ठरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी याआधीच सांगितले होते की येत्या २६ जानेवारी रोजी आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याप्रमाणे त्याठिकाणच्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सुरक्षेच्यादृष्टीकोनातून खबरदारी घ्यावी लागते. मात्र, सध्या दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर का करण्यात आला याचे मलाही कारण माहित नाही. माझ एकच म्हणणे आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. केंद्राने एवढी टोकाची भूमिका घेऊ नये”.

देशभरात उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेले शेतकऱी आज राजधानीत प्रवेश करत असून ट्रॅक्टर मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. राजपथावरील संचलनानंतर शेतकऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड्स शेतकऱ्यांनी तोडल्याने पोलीस व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीत तणाव, शेतकरी आक्रमक, पोलिसांच्या वाहनांवर हल्लाबोल, बंदुकाही हिसकावल्या, बसेस पेटवल्या


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -