घरताज्या घडामोडी'सरकार जाणार' हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केले की झोपेत?...

‘सरकार जाणार’ हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना केले की झोपेत? अजितदादांचा सवाल

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांतदादांचा घेतला चांगलाच समाचार.

‘जनता झोपेत असताना ठाकरे सरकार पडेल’, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावरुन अनेक सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकाही केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चंद्रकांतदादांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘सरकार जाणार’ हे वक्तव्य दादांनी जागेत असताना केले की झोपेत असताना केले’, असा पलटवार अजित पवारांनी शनिवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

काय म्हणाले अजित पवार?

“ज्या दिवसापासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आले आहे. त्या दिवसापासून भाजपला सातत्याने आपण सत्तेत नसल्याचे बोचत आहे. आपण सत्तेत नाही हे सत्य त्यांना सातत्याने असह्य करत आहे. त्यामुळे आपल्या सोबत कायम कार्यकर्त्यांनी राहावे, याकरता काहीना काही बोलत राहावे. जेणेकरुन चर्चेत राहू. पण, “भाजपने देखील हे लक्षात ठेवावे. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना असे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. तोपर्यंत सरकार राहणार”.

- Advertisement -

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

“महाविकास आघाडी सरकारची सत्ता येऊन आता १८ महिने झाले आहे. हे १८ महिने म्हणजे त्यांना मिळालेला बोनस आहे. आता लोक झोपेत असताना सरकार कधीही जाईल. कारण १८ महिन्यापासून सरकार बॅग भरुन तयार आहे. यामध्ये कोविडची महामारी असो किंवा मग त्यांचे नशिब असो. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. तसे आता जनता झोपेत असताना सरकार जाईल”.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी

राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत खडाजंगी झाल्याचे समोर आले. काही मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावरुन नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली. त्या बैठकी दरम्यान त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, “राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेची जबाबदारी नाही”.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona: पावसाळ्यात अधिक खबरदारी घ्यावी लागेल, कारण…- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -