यांचा हा राडा पाहून हनुमान सुद्धा डोक्याला हात मारून घेत असेल – अजित पवार

Ajit Pawar said that he will withdraw the charges in the Punatamba agitation case

राज्यात सध्या धार्मिक वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हनुमानाच्या जन्मस्थळाचा नवा वाद पेटाल आहे. एक साधुंचा गट म्हणतो हनुमानाचा जन्म हा किष्किंधामध्ये झाला तर दुसरा गट म्हणतो की अंजनेरी येथे हनुमाचा जन्म झाला. त्यावरून नाशिकमध्ये अयोजित परिषदेत जोरदार राडा झाला. साधू महंत एकमेकांवर धावून गेले. हे प्रकरण अंगावर माईक उगारण्यापर्यंत गेले होते यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हमरातुमरीवरून साधू, महंतांना चिमटे काढले आहेत .

साधू, महंतांचा स्वभाव हा शांत असतो, महंतांनी गप्प बसावं तर हे ते माइक घेऊन मारताहेत एकमेकांना आणि आपण त्यांना महंत, महाराज म्हणतो, असा टोला अजित पवारांनी लगावाला आहे. तसेच यांचा हा राडा पाहून हनुमान सुद्धा डोक्याला हात मारून घेत असेल अरे हा काय प्रकार आहे, कोण म्हणतोय मारुती येथे जन्मला तर कोण म्हणतं इथे जन्मलो, अरे तुम्हाला शनिवार दर्शनाला जायचे आहेच ना आणि महंत महंत म्हणता आणि माईक घेऊन मारायला उठताय, असे म्हणत अजित पवार यांनी या वादावर फटकेबाजी केली आहे.

राणा दाम्पत्याचा समाचार –

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला अजित पवारांनी टोला लगावला. काही व्यक्ती संस्था, संघटनांकडून जातीच्या धर्मच्या नावने विष पेरणे सुरू आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला , कोण आहेत या शक्ती? कुणाचा हात आहे यामागे ? असा प्रश्न त्यांनी केला आहे. कुणीही उठायचे आणि कुठे जायचे आणि हनुमान चालीसा म्हणायची, मी जर म्हणलो भोसरीत जाऊन अजित गव्हाणेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार तर चालेल का? मला माझे काठेवाडीच घर आहे, फारफार तर मुंबई मधील देवगिरीच घर आहे, तिथे हनुमान चालीसा म्हणता येईल, कुणालाही आपल्या कृती मुळे त्रास होताकामा नेये, असे म्हणत अजित पवारांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला.