घरमहाराष्ट्रपुणेराज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून अजित पवारांनी सरकारला सुनावले

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून अजित पवारांनी सरकारला सुनावले

Subscribe

अकोल्यातील दंगलीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य करत सरकारची कानउघडणी केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची असते, असे त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर मत व्यक्त केले.

राज्यात गेल्या काही महिन्यात जातियतेच्या भिंती उभ्या राहिल्याने सामाजिक सलोखा बिघडला आहे. राम नवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी नगरमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद झाला. तिच परिस्थिती आता रविवारी (ता. 14 मे) अकोला शहरात निर्माण झाली होती. शहरातमध्ये आणखी कोणती परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण या मुद्द्यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अकोल्यातील दंगलीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य करत सरकारची कानउघडणी केली आहे. (Ajit Pawar criticized the government over law and order in the state)

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारची असते, असे त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर मत व्यक्त केले. आज (ता. 19 मे) पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – MPSC : तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी घ्या, जयंत पाटलांची मागणी

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये बजरंग बली यांना डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्षांनी प्रचार केला. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-पांडूरंदगाची मूर्ती दिली जाते, त्याप्रमाणे कर्नाटकात जाणीवपूर्वक बजरंग बलीची मूर्ती देण्याचे काम करण्यात आले. पंतप्रधानांनी सुद्धा बजरंग बलीली डोळ्यासमोर ठेवून प्रतार केला आणि मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु, सेक्युलर असलेल्या भारचतामधल्या लोकांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही, असे म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

जातीयतेच्या घटना घडता कामा नये…
गेल्या काही दिवसांत अकोला, शेवगाव आणि आता त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या घटना घडल्या, वास्तविक त्या घटना अजिबात घडता कामा नये. राज्य सरकार, पोलीस खात्याची ही जबाबदारी आहे. कोणी भावनिक मुद्दा करून जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले तर पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी अजित पवारांनी दिला.

कोणी काय शिंपडाव, हा ज्याचा त्याचा अधिकार…
त्र्यंबकेश्वरच्या घटनेमध्ये काही संघटना पुढे आल्या. तिथे गोमुत्र शिंपडले गेले. कोणी काय शिंपडाव, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण आपल्या इथे सर्व जाती-धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. अनेक धार्मिक स्थळी लोकं ये-जा करत असतात. पण त्र्यंबकेश्वरच्या आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिथे 100 वर्षांपासून ती परंपरा सुरू आहे. पण का अशा प्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातायंत. सोशल मीडियाचा वापर करून समाजामध्ये गैरसमज आणि तेढ निर्माण केली जातेय, असेही यावेळी अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, अशा काही घटना घडल्यानंतर राज्यातील काही पक्षांचे नेते, त्यांचे प्रवक्ते किंवा ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असे लोक या गोष्टी शांत करण्याच्याऐवजी आणखी पेटवून देत आहेत, असे झाले नाही पाहिजे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून याबाबतची खबरदारी घेऊ आणि राज्यात शांतता राखून ठेवण्यासाठी सरकारला सहकार्य करू, असेही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -