घरताज्या घडामोडी145 आमदारांचं पाठबळ असेपर्यंत हे सरकार टीकेल, अजित पवारांचा टोला

145 आमदारांचं पाठबळ असेपर्यंत हे सरकार टीकेल, अजित पवारांचा टोला

Subscribe

145 आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडे जोपर्यंत असेल तोपर्यंत हे सरकार टीकेल. ज्या दिवशी ते पाठबळ जाईल. त्यादिवशी हे सरकार जाईल, असा खोचक टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टात जी सुनावणी सुरू होती. त्याचा निकाल लवकर लागेल अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु ते पाच लोकांच्या घटनापीठाकडे गेलं आहे. आता तिथे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर या गोष्टीला मान्यता दिली तर लोकशाही ही आपल्या देशात राहणार नाही.

जवळपास २५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या झाल्या आहेत. विकास कामांना स्थगिती दिल्यानंतर आम्हाला गोंधळ घालून सभागृह बंद पाडता आलं असतं. परंतु त्यामधून इतर कामकाज रेंगाळलं असतं. परंतु त्यांनी सांगितलं की, त्यामधून आपण मार्ग काढू. सरकार बदलत असतात, येत असतात आणि जात असतात. परंतु फक्त सत्ताधारी पक्षालाच निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदाराला अजिबात निधी द्यायचा नाही, असं कधी घडलं नव्हतं. आम्ही सरकारमध्ये असताना १ ते ५ कोटीपर्यंतचा आमदार निधी सर्व सभागृहातील ३५० आमदारांना दिला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना थोडं झुकतं माप दिलं जातं, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

टीईटीची चौकशी झाली नसतानाही अधिकाऱ्यांना कामावर कसं काय घेता?

एसी लोकलबाबत प्रवाशांनी आंदोलन केलं होतं. परंतु त्यांची मागणी आता पूर्ण व्हायला लागली आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि टीईटी घोटाळ्याबाबत त्यांनी सांगितलं की, यामध्ये आरोप असतील. पण त्यांना आम्ही सांगितलं की, टीईटीची संपूर्ण चौकशी झाली नसतानाही अधिकाऱ्यांना तुम्ही कामावर कसं काय घेता?, त्याचं उत्तर ते देऊ शकले नाही, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

सायबर गुन्हेगारीत वाढ

मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. १६ ते १८ वयोगटाच्या मुलांकरिता वेगळ्या कायद्यामध्ये रुपांतर करावं लागेल. त्याला आपल्याला वेगळं स्वरूप द्यावं लागेल. त्याकरिता त्यांना आमची पूर्ण सहकाऱ्याची भूमिका आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून फार अडचणी निर्माण होत आहेत. शाळा आणि कॉलेजमध्ये जात असताना आणि अगदी लहान वयात असताना ते आपला फोन सुरू करतात. त्यामध्ये चॅटिंगचं सुरू होतं. त्यामुळे अनेक गैरप्रकार घडतात. सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असं पवार म्हणाले.

आमदारांच्या वर्तनाबद्दल १०० टक्के आचार संहिता हवी

आम्ही तुमचे समर्थक आहोत, असं काही आमदारांचा दाखवण्याचा केविलवाणा प्रयोग असतो. परंतु त्याची नोंद विरोधी आणि सत्ताधारी पक्षाने घेतली पाहीजे. कारण आपल्या महाराष्ट्राच्या विधीमंडळाने बघण्याचा दृष्टीकोन उभ्या भारताचा फार वेगळा आहे आणि परंपरा फार मोठ्या व्यक्तिंची आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहीजे, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : वसंतदादा साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा; अभिजीत पाटलांचा संदर्भ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -