काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये करू शकता, अजित पवारांची कोपरखळी

ajit pawar

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल(रविवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या खातेवाटपावरून शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु दीपक केसरकर, दादा भुसे, संदीपान भुमरे आणि गुलाबराव पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता कोणतंही खातं जास्त आणि कमी महत्त्वाचं नसतं. सर्व खाती महत्त्वाची असतात. कारण काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये करू शकता, अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील नेत्यांना मारली आहे.

…तर कुठल्याही खात्यामध्ये करू शकता

आज शिंदे साहेबांचं सरकार आहे. आज त्यांच्या सरकारमध्ये कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला नाही करायचं, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. कुणाला कोणती खाती द्यायची, हा देखील सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेंचा आहे. आपण जे म्हणतो की, हे वजनदार खातं, हे थोडसं हलकं फुलकं खातं असं नाहीये. काम करायचं म्हटलं तर कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही काम करु शकता, असं अजित पवार म्हणाले.

…त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे

मी गेल्या वर्षभरापासून खातं बदलून देण्याची मागणी केली होती. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आताच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दुसरी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कोणतीही जबाबदारी आपल्याला विश्वासाने दिली जाते, त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्यांची

खाते कुणाला कोणतं दिलं यापेक्षा सर्व खात्यांवर सामूहिक जबाबदारी ही मंत्र्यांची असते. मी जरी पाणीपुरवठा खात्यांचा मंत्री असलो तरी माझी इतर खात्यांवर जबाबदारी आहे. प्रत्येक खात्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची जबाबदारी ही मंत्र्यांची असते, असं गुलाबराव पाटील म्हणाले.


हेही वाचा : उंदराला सापडली चिंधी.., खातेवाटपानंतर गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला