घरमहाराष्ट्र...तर सर्वसामान्य जनतेने काय करायचे, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

…तर सर्वसामान्य जनतेने काय करायचे, अजित पवारांची एकनाथ शिंदेंवर टीका

Subscribe

पुणे – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लाऊडस्पीकरबाबतच्या नियमांचे उल्लघन केल्याप्रकणी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उसताना शिस्तीने वागायचे. मात्र, आता वेगळेच चित्र पहायला मिळते आहे. कायदे करणारे जर नियम मोडत असतील तर सर्वसामान्य जनतेने काय करायचे, असेही बोलणार एक वर्ग असतो. त्यामुळे सर्वांनी कायद्याचे पालन करावे, असे अजित पवार म्हणाले.

दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येणार नाही –

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सरकारकडून जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करा, असे सांगत आहोत. मात्र, लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना अधिकार नाहीत. याबाबत शिंदेंनी उत्तर द्यायला हवे. दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.सु प्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार थांबवल्याचे समोर आले आहे, अशी टीका शिंदे सरकारवर केली.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले तरी गुन्हा दाखल करा –

- Advertisement -

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीची काही दिवसांपूर्वी पुण्यात तोडफोड झाली होती. यावर या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज असून हल्ल्यामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. हा प्रकार भ्याड आहे. हल्ला करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असले तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे अजित पवार म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -