घरताज्या घडामोडी'तौक्ते'साठी गुजरातला १ हजार कोटी, महाराष्ट्राला जेवढं योग्य वाटत तेवढं तरी द्या',...

‘तौक्ते’साठी गुजरातला १ हजार कोटी, महाराष्ट्राला जेवढं योग्य वाटत तेवढं तरी द्या’, अजित पवारांची पंतप्रधानांवर टीका

Subscribe

'तौक्ते'साठी गुजरातला १ हजार कोटी, महाराष्ट्राला जेवढं योग्य वाटत तेवढं तरी द्या', अशी मागणी करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

‘तौक्ते चक्रीवादळा’चा महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसला. परंतु, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा केला. विशेष म्हणजे गुजरातचा दौरा केल्यानंतर त्यांनी तात्काळ गुजरातला १ हजार कोटीची मदत देखील जाहीर केली. पण, महाराष्ट्र दौरा केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रिपल्बिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना केली. मुंबईत आज मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु करण्यात आली त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘केंद्र सरकार महाराष्ट्राला सातत्याने सापन्न वागणूक देत आहे. गुजरातला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर एक हजार कोटी रुपयांची मदत केली. पण, महाराष्ट्राला केंद्राकडून अद्याप काहीच मदत नाही’, याची अजित पवारांनी पुन्हा एकदा विरोधकांना आठवण करुन दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘राज्य सरकारने देखील केंद्राची वाट न बघता राज्यातील नागरिकांना मदत केली’.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटातही विकासाला खीळ बसू दिली नाही

‘महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर एकना एक संकट येण्यास सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रावर कोरोनाचे महासंकट आले. मात्र, अशा परिस्थित देखील महाराष्ट्राने विकास कामे केली. कोरोनाच्या संकटातही विकासाला खीळ बसू दिली नाही. त्यामुळे संकटं आली तरी विकास थांबणार नाही’, असे  आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -