Homeमहाराष्ट्रAjit Pawar : धनंजय मुंडेंवर खालचे कार्यकर्ते खापर फोडतायत, अजित पवारांची कोणावर...

Ajit Pawar : धनंजय मुंडेंवर खालचे कार्यकर्ते खापर फोडतायत, अजित पवारांची कोणावर टीका?

Subscribe

सुरेश धस यांनी मागणी केली की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर अजित पवार यांनी घ्यावा. सुरेश धसांच्या या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांचा खालचा कार्यकर्ता असाही उल्लेख केला.

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला संशयित वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. त्यांच्यावर मकोकाअंतर्गात कारवाई करण्यात आली असून सध्या तो बीड जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते धनंजड मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत. यानंतर आज सुरेश धस यांनी मागणी केली की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर अजित पवार यांनी घ्यावा. सुरेश धसांच्या या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांचा खालचा कार्यकर्ता असाही उल्लेख केला. (Ajit Pawar criticizes Suresh Dhas for accusing Dhananjay Munde)

सुरेश धस यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, सुरेश धस यांना काय वाटतं? त्याच्याशी मला काहीही देणंघेणं नाही. मी महायुतीच्या सरकारमध्ये भाजपाच्या बरोबर आहे. त्यामुळे मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार पुढे चालावं, त्यासाठी आम्ही प्रमुख म्हणून निर्णय घेत असतो. मात्र वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते असं बोलायला लागले तर त्याला काही अर्थ राहणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाची जी काही भूमिका असेल ती आम्हाला सांगतील, असे म्हणत अजित पवार यांनी सुरेश धसांवर टीका केली.

हेही वाचा – Ajit Pawar : धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच? दमानियांनी दिलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासणार

अजित पवार पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर नेतेमंडळी खापर फोडत नाहीत तर खालचे कार्यकर्ते फोडत आहेत. नेते मंडळींशी मी संपर्कात आहे. मात्र, तुम्ही कोणाला नेते समजता मला माहिती नाही. कारण मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दुष्टीने पक्षाचे नेते नाहीत, अशी घणाघाती टीकाही अजित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी सरकारमध्ये नैतिकता नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे की नाही, ते आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – Beed Police : परळीत काही अधिकारी 20 वर्षांपासून एकाच पोस्टवर, सुरेश धस यांचा रोख कोणाकडे?