अजित पवारांनी साधला सरकारवर निशाणा, म्हणाले… “सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही…”

राज्यामध्ये कोटींच्या घरात बिलांची देणी बाकी असल्याने अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवार असो किंवा कुणीही असो सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही, असे म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

Ajit Pawar criticizes the state government

अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या शैलीतून कायमचं सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. आज (ता. 20 मे) पुन्हा एकदा अजित पवार यांनी राज्य सरकारवर त्यांच्या कारभारामुळे निशाणा साधला आहे. राज्यामध्ये कोटींच्या घरात बिलांची देणी बाकी असल्याने अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. अजित पवार असो किंवा कुणीही असो सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही, असे म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. पवारांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमाला आज (ता. 20 मे) हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषणातून राज्य सरकारवर सडकून टीका केली. (Ajit Pawar criticizes the state government)

हेही वाचा – केंद्राच्या फतव्यांमुळे राज्याची आर्थिक शिस्त बघडली, नोटबंदीवरुन अजित पवारांनी फटकारले

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, देशाच्या भल्याकरीता एखादा निर्णय असेल तर आमचं काही म्हणणं नाही. देशहित महत्त्वाचं असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी राज्याचं अर्थखातं पाहिलं आहे, राज्याचे अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनीही काम पाहिलं आहे. एक प्रकारची आर्थिक शिस्त आम्ही ठेवली होती. आमची एवढीच भावना असते की विकास झाला पाहिजे. कोरोनाचं सावट असताना मी राज्याचा अर्थमंत्रीही होतो. त्यावेळी अँब्युलन्स, कोरोना व्हॅक्सिनचे डोस, जंबो रुग्णालय यासह आम्ही कमी पडलो नाही. उत्पन्न घटलं होतं पण आम्ही राज्याला पुढे नेत होतो, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

आज राज्यामध्ये 1 लाख कोटींची 31 मार्चच्या आधीची बिलं देणं बाकी आहे. कुठे पैसे गेले? आर्थिक शिस्त का नाही? असे प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केले. आत्ताच्या राज्य सरकारला 11 महिने झाले आहेत, असे म्हणत ते म्हणाले की, “अरे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काय काय केलं हे जनतेला माहित आहे. या वर्षभरात गद्दार शब्द, पन्नास खोके हे शब्द जनतेले पटले आहेत. या सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे.”

मविआच्या काळात ज्या कामांना स्थगिती दिली होती ती अद्याप उठवलेली नाही. काय कारण आहे? ही काय आमची घरची कामं नव्हती. सत्ता बदलत असते, कुणी कायमचं त्या खुर्चीवर बसत नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं? अजित पवार असो किंवा कुणीही असो सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सरकार बदललं तेव्हा आम्हीही कुणाची कामं बंद केली नाहीत असं अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला सुनावले आहे.

तसेच, आम्हालाही वाटतं की विकास झाला पाहिजे त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. कोल्हापूरचा विकास करत असताना इथली रांगडी माती, इथला निसर्ग या सगळ्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे असेही यावेळी अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले.