घरताज्या घडामोडीराज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा मुद्दा निकाली काढा, मगच विदर्भ, मराठवाड्याला निधी -...

राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा मुद्दा निकाली काढा, मगच विदर्भ, मराठवाड्याला निधी – अजितदादा

Subscribe

विदर्भ मराठवाड्याच्या वैधानिक विकास मंडळावर विरोधक आक्रमक

वैधानिक विकास मंडळावर भाजप आज अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झाली. वैधानिक विकास मंडळाचा आर्थिक तरतुदीचा बॅकलॉग भरून काढण्याचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. त्यामुळेच विदर्भ आणि मराठवाड्याला योग्य निधीवाटप व्हावे अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी उत्तर देताना सांगितले की जोवर १२ राज्यपाल नामनिर्देशीत आमदारांचा मुद्दा निकाली निघणार नाही त्यानंतरच अधिवेशनात याबाबतची घोषणा करण्यात येईल असे अजितदादा यांनी सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत सांगितले की, १२ आमदारांकरिता विदर्भ आणि मराठवाड्याला हा ओलीस ठेवण्याचा प्रकार आहे. म्हणूनच मी अजितदादांना विनंती करतो की तुम्ही १२ आमदारांकरिता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवणार असाल तर आम्ही संघर्ष करून यासाठीचा न्याय मिळवू. हा निधी आमच्या हक्काचा आहे, आम्ही आमच्या हक्काच घेतल्याशिवाय राहणार. जे संविधानाने मिळवले ते मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे फडणवीस म्हणाले. (Maharashtra Assembly Budget Session 2021) विरोधकांनी

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला विचारणा केली की मराठवाडा आणि विदर्भाचा बॅकलॉग राहिला आहे का ? हेदेखील तपासायला हवेत. हे रात्री आणि पहाटेच्या गोष्टी करतात. विरोधी पक्ष असे का वागतात असे अजुनही कळाले नाही असेही नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी राज्यपालांवर कमेंट करताच राज्यपालांवर कमेंट करण्याची पद्धत कामकाजात कधीपासून आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

तुम्ही सात वेळा मी दहा वेळा विनंती करतो – अजित पवार

मराठवाडा, विदर्भ उर्वरीत विकास मंडळ तयार करण्याच्या विचाराच महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्राला जनतेला सांगतो की मंत्रीमंडळाच्या साक्षीने सांगतो की विदर्भ मराठवाडा विकास मंडळ करणार आहोत. त्यात कुणीही राजकारण करून नये. अर्थसंकल्पात महामंडळ अस्तित्वात आहेत हे समजूनच अनुशेष निधीवाटपात करण्यात येईल. अधिकचाच पैसा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा राहणार आहे असे अजितदादा पवार यांनी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -