घरताज्या घडामोडीसीएनजी पुरवठा पूर्ववत करुन लोकांचा त्रास थांबवा, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी

सीएनजी पुरवठा पूर्ववत करुन लोकांचा त्रास थांबवा, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी

Subscribe

मुंबई, ठाण्यात दोन दिवसांपासून सुरु असलेली सीएनजीचा तुटवड्याची समस्या राज्य सरकारने गांभीर्यानं घ्यावी आणि नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.

मुंबई, ठाण्यातल्या पेट्रोलपंपावर रिक्शा, टेम्पो, कार आदी वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी कित्येक तास अधिक वेळ रांगेत थांबावं लागत आहे. त्यातून अनेकांचा रोजगार बुडत आहे. बहुतांश पेट्रोलपंपांवरचा सीएनजी साठा संपला आहे. जिथं साठा आहे तिथं कमी दाबानं पुरवठा होत आहे, स्वत:च्या ठाणे शहरातील ही समस्या सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सपशेल अपयशी ठरले असल्याची टीकाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांना सूत्रे हाती घेऊन दीड महिना झाला आहे, त्यांनी आतातरी स्वत:चे स्‌वागत, सत्काराचे कार्यक्रम थांबवावेत आणि राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. पेट्रोल, डिझेलसह सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा तुटवड्यामुळे रिक्शा, टॅक्सी, टेम्पो आदी प्रवासी वाहनचालकांचा रोजगार बुडत आहे, याकडे राज्य सरकारने गांभीर्यान बघावं.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन साजरा होत असताना मुंबई, ठाण्यातील सीएनजी टंचाई आणि खड्यांमुळे प्रवाशांचे जात असलेले बळी हे राज्य सरकारसाठी लाजीरवाणी बाब असल्याचेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : उपेक्षित, वंचितांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -