घरताज्या घडामोडीलसींसाठी राज्याला आणि केंद्राला वेगवेगळा दर चालणार नाही, अजितदादा गरजले !

लसींसाठी राज्याला आणि केंद्राला वेगवेगळा दर चालणार नाही, अजितदादा गरजले !

Subscribe

लसीच्या दराबाबत अजितदादांचा सीरमच्या अदर पूनावाला यांना फोन

केंद्राला लस देताना लस निर्मिती कंपन्या वेगळ्या दराने लस पुरवठा करत आहेत. तर राज्याला लस देताना वेगळे दर आहेत. म्हणूनच केंद्राला वेगळा आणि राज्याला वेगळा दर देऊन चालणार नाही. लवकरच जेव्हा सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला मुंबईत येतील त्यावेळी पूनावालांकडे बैठक घेणार आहे अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्याला वेगळा आणि केंद्राला वेगळा दर असा देऊन चालणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच पुण्यात ४५ वयोगटाच्या वरील २२ लाख लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. पण अनेक लोकांना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. त्यासाठीच मुंबईला गेल्यावर हा लसींचा पुरवठा वाढवून दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. लस इतर देशांना पाठवण्याएवजी केंद्र सरकारने देशात पुरवली असती तर लसीचा तुटवडा जाणवला नसताही असेही मत त्यांनी व्यक्त केले.

अदर पूनावाला यांना मी फोन केला होता. पण येत्या दहा ते बारा दिवसात भारतात येण्याची शक्यता नाही. ते सध्या युकेमध्ये आहेत. पण लसीच्या पुरवठ्याबाबत मी अदर पूनावाला यांच्यासोबत बोलणार आहे असेही अजितदादा म्हणाले. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस महाराष्ट्र सरकारला कमी मिळत असल्याने अडचण निर्माण होत आहे. म्हणूनच अदर पूनावाला यांच्याशी संपर्क साधून हा पुरवठा कसा वाढवता येईल यासाठीही बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

तिसरी लाट येत्या काळात येईल अशी शक्यता सध्या व्यक्त करण्यात आहे. यापुढच्या कोरोनाच्या लाटेमध्ये अशी वेळ पुण्यात येऊ नये म्हणून जी काही पायाभूत सुविधा उभे करण्याची गरज आहे त्या उपाययोजना करण्यासाठी घेतल्या आहेत. त्यामध्ये दळवीनगर आणि ससूनचा ऑक्सिजन प्लॅंट सुरू करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस महाराष्ट्र सरकारकडून कमी असल्याने अडचण निर्माण होत आहे. पुरवठ्यात वाढ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. अदर पूनावाला यांच्यासोबत युकेमध्ये बोलण्याचेही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -