घरताज्या घडामोडीगायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य; विद्यमान मंत्र्यांची चौकशी करा, अजित पवारांची मागणी

गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य; विद्यमान मंत्र्यांची चौकशी करा, अजित पवारांची मागणी

Subscribe

वाशिम जिल्ह्यातीत गायरान जमिनीचं वाटप गैरव्यवहार पद्धतीने झाल्याचा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. दरम्यान, विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तारांना लक्ष्य केलं.

गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य पद्धतीने झालं आहे. तसेच या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करावी. मात्र, चौकशी होईपर्यंत त्यांचा राजीनाम घ्या, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

- Advertisement -

तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खासगी व्यक्तिला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. ज्यावेळी मंत्री पदाची शपथ घेऊन मंत्री कामाला सुरूवात करतात. त्यावेळी या घटना घडणं योग्य नाही. गायरान जमिनीबाबत वेगळ्या प्रकारचे आदेश असताना पण जमिनीचं वाटप करण्यात आलं, अजित पवार म्हणाले.

अशी प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकरणातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

अब्दुल सत्तारांवर आरोप काय? 

सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभागात पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. तर या सर्व प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तार यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, बाहेर येताच सत्तारांनी दिली प्रतिक्रिया…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -