घरमहाराष्ट्रथेट सरपंच निवडीला विरोध करणारे म्हणतात, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही थेट निवडा!

थेट सरपंच निवडीला विरोध करणारे म्हणतात, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही थेट निवडा!

Subscribe

Ajit Pawar | युती सरकारने केलेला निर्णय महाविकास आघाडीच्या काळात बदलण्यात आला होता. आता तेच थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड करण्याची मागणी करत आहेत. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचा कोल्हापुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

Ajit Pawar | कोल्हापूर – सरपंचांची ज्याप्रमाणे थेट जनतेतून निवड करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधानही थेट जनतेतून निवडून द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. थेट सरपंच निवडीला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता. युती सरकारने केलेला निर्णय महाविकास आघाडीच्या काळात बदलण्यात आला होता. आता तेच थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड करण्याची मागणी करत आहेत. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचा कोल्हापुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – पहाटेचा शपथविधी ते चालणारा बैल…, पुण्यात राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

- Advertisement -

अजित पवार नवनियुक्त सरपंचांना संबोधित करताना म्हणाले की, तुम्हाला संधी मिळाली आहे. तुम्ही थेट लोकांमधून सरपंच झाला आहात. हा ठराव करत असताना आम्ही विरोध केला होता. थेट सरपंच करता, मग थेट पंचायत समितीचा सभापती करा. थेट नगराध्यक्ष करता मग थेट महापौर करा. नगराध्यक्षही जिल्ह्याने निवडू द्या. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राज्याने निवडू द्या, देशाचा पंतप्रधान देशाला निवडू द्या.

‘ठराविक ठिकाणी लोकांच्या मधून निवडणणार. ठराविक ठिकाणी आमदारांतून मुख्यमंत्री निवडणार, ठराविक ठिकाणी खासदारांतून पंतप्रधान निवडणार हे कसं चालेल. संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्या संविधानाने सगळ्यांना सारखा अधिकार दिला आहे. त्यामध्ये बहुमताला जास्तीत जास्त महत्त्व दिलं आहे. काही ठिकाणी असं होतं की सरपंच होतो एका विचारांचा आणि बॉडी येते दुसऱ्या विचारांची. म्हणजे विरोधी पक्षांची. सरपंच कोणता ठराव करायला गेला की बॉडी विरोध करते. बॉडीने काही सांगितलं की सरपंच विरोध करतो. अक्षरशः ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो. पण कायदाच झाला आहे, यदाकदाचित त्यांची बॉडी वेगळ्या विचारांची असेल तर निवडणुका तेवढ्यापुरता ठेवा, तुम्हाला गावचा कारभारीपण मिळालं आहे. त्यामुळे गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करा. ज्या उद्दाशाने तुम्हाला निवडून दिलं आहे, तिथे वाद घालता कामा नये, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – सोशल मीडिया की वर्तमानपत्र? राज ठाकरेंचं आवडतं माध्यम कोणतं?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -