घरमहाराष्ट्रAjit Pawar : "तुम्ही का मिठाचा खडा टाकता?" वयाच्या प्रश्नावर अजित पवारांची...

Ajit Pawar : “तुम्ही का मिठाचा खडा टाकता?” वयाच्या प्रश्नावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया

Subscribe

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ते जे काही बोलतात ते डंके की चोटपे बोलतात, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे शरद पवार यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कायमच त्यांच्या वयावर टीका केली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. परंतु, आज एका मुलाखतीच्या कार्यक्रमात अजित पवारांना त्यांच्या वयावरून प्रश्न विचारण्यात आला. ज्यानंतर त्यांनी मुलाखतकाराला आपली एवढी चांगली मुलाखत सुरू असताना त्यात मीठाचा खडा का टाकत आहात? असा थेट प्रश्न विचारला. ज्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. (Ajit Pawar difficult reaction to the question of age in an interview in Kolhapur)

हेही वाचा… Ravindra Waikar : 9 तास ईडी चौकशीनंतर रवींद्र वायकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र; म्हणाले…

- Advertisement -

कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आज (ता. 29 जानेवारी) डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याचा अधिवेशनात अजित पवारांची मुलाखत देखील आयोजित करण्यात आली होती. अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजित पवारांनी देशातील आणि राज्यातील सध्याचे राजकारण तसेच जुन्या काळातील आठवणी सांगितल्या. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबतही भाष्य केले.

या मुलाखतीत अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी अजितदादांना राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का? असा प्रश्न विचारला. ज्यानंतर या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आता आपली एवढी चांगली मुलाखत सुरू आहे, यात तुम्ही का मीठाचा खडा टाकत आहात. अजित पवारांकडून ही प्रतिक्रिया येताच सभागृहात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना हसू फुटले. या मुलाखतीत अजित पवारांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचेही कौतुक केले. ज्यावेळी जगात मंदीची लाट आली होती तेव्हा भारत देश वाचला ते फक्त मनमोहन सिंह यांच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे, असे सांगत पवारांनी मनमोहन सिंह यांचे कौतुक केले.

- Advertisement -

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते म्हणाले की, आता तसेच नेतृत्व पीएम नरेंद्र मोदी यांच्यात आहे, देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करा म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात वंदे भारत ट्रेन, हायवे मोठे करण्याच काम , परदेशात भारताच स्थान वेगळ निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आता आपण एकत्रित आहोत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. जनता जनार्दन जे ठरवेल तेच होते. सध्या बिहारमध्ये जे घडले आहे, त्यात थोडस वेगळ आहे. आम्हाला असे कळले की तिथे नितीश कुमार यांच्या पक्षातील आमदार फोडण्याच काम सुरू होते. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा अजित पवारांकडून या मुलाखतीत करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -