घर महाराष्ट्र Ajit Pawar : शरद पवारांच्या भेटीसोबतचा अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले -

Ajit Pawar : शरद पवारांच्या भेटीसोबतचा अजित पवारांनी केला खुलासा, म्हणाले –

Subscribe

शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) अजित पवार यांनी पुण्यात उद्योजक चोरडिया यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. ज्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले. अजित पवार यांनी आज (ता. 15 ऑगस्ट) त्यांच्या या गुप्त भेटीबाबत खुलासा केला आहे.

कोल्हापूर : 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी विविध जिल्ह्यात ध्वजारोहण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरात जाऊन ध्वजारोहण केले. या कार्यक्रमानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी आणि कोल्हापूरातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्ह्यातील विविध गोष्टींची त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) अजित पवार यांनी पुण्यात उद्योजक चोरडिया यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. ज्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले. अजित पवार यांनी आज (ता. 15 ऑगस्ट) त्यांच्या या गुप्त भेटीबाबत खुलासा केला आहे. (Ajit Pawar disclosed the meeting with Sharad Pawar)

हेही वाचा – मतांच्या धृवीकरणासाठी धार्मिक सलोख्यावर ‘बुलडोझर’, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisement -

पत्रकारांनी अजित पवार शनिवारी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत प्रश्न केला. त्यावेळी ते म्हणाले की, पुण्याच्या बैठकीचे काही मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. घरातल्या व्यक्तींना भेटणे हे चुकीचे आहे का? तुम्ही मीडियावाले त्याला वेगळी प्रसिद्धी देता. तिथे काही वेगळं घडलेले नाही, त्यामुळे फारसा विचार करण्याची गरज नाही. पण भेट घेतली त्यात काय चूक आहे, असा प्रश्न देखील यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

पुढे ते म्हणाले की, मी कधीही कुठेही लपून गेलेलो नाही. मी उथळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे आहे का? असा म्हणत त्यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला.

- Advertisement -

शनिवारी जेव्हा अजित पवार हे चोरडिया यांच्या घरी शरद पवारांच्या भेटीकरिता गेले, तेव्हा या बंगल्याच्या बाहेर येताना एक गाडी या बंगल्याच्या गेटला धडकली. जी गाडी गेटला धडकली त्या गाडीमध्ये अजित पवार होते, असे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत जेव्हा आज अजित पवार यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, मी त्या गाडीत नव्हतो, त्यामुळे गाडी धडकल्यानंतर त्याच्या बाहेर येण्याचा प्रश्नच येत नाही.

त्याचप्रमाणे चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत. चोरडियाचे वडील शरद पवारांचे वर्गमित्र होते. शरद पवार व्हीएसआयचा कार्यक्रम संपवून येणार होते. माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता. तो कार्यक्रम संपवून माझे पुढचे कार्यक्रम होते. चोरडियांनी शरद पवारांना जेवायला बोलवले होते. जयंत पाटील शरद पवारांबरोबर होते. कारण तेही त्या व्हीएसआयच्या कमिटीत आहेत. मीही व्हीएसआयला आहे. पण नितीन गडकरींनी चांदणी चौकातल्या एका कार्यक्रमाबाबत मला महिन्याभरापूर्वी सांगितले होते. त्यामुळे मला त्या मीटिंगला हजर राहायचे होते. व्हीएसआयमध्ये मी सांगितले की मी येऊ शकत नाही. त्यामुळे जर दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवले तर त्यातून वेगळा अर्थ काढायचे काहीच कारण नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisment -