घरमहाराष्ट्रAjit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरे युतीत येणार असतील तर...,...

Ajit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरे युतीत येणार असतील तर…, काय म्हणाले अजित पवार?

Subscribe

मनसे महायुतीत सहभागी होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा लवकरच महायुतीत सहभागी होणार आहे. तशा राजकीय हालचालींना आता वेगही आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर काल बुधवारी (ता. 20 मार्च) रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी अज्ञातस्थळी भेट घेऊन चर्चा केली.

हेही वाचा… Chitra Wagh : गुजरातने मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिलाय, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

- Advertisement -

काल झालेल्या भेटीनंतर आज (ता. 21 मार्च) सकाळी पुन्हा राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दीड तास बैठक पार पडली. मुंबईतील पंचतारांकित ताज लॅण्ड हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित नव्हते. परंतु, त्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. (Ajit Pawar expressed his opinion about Raj Thackeray participation in Mahayuti)

मनसे महायुतीत सहभागी होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज ठाकरे महायुतीत येणार अशी चर्चा सुरू आहे. अंतिम चर्चा काय झाली हे माहिती नाही. आणखी एक बैठक होणार आहे असे माध्यमांमधून कळाले आहे. शेवटी कोणत्याही युतीत जर कोणी आले तर बेरीजच होत असते. त्याचा फायदाच होत असतो. त्यामुळे राज ठाकरे येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यामुळे अजित पवारांकडून तरी राज ठाकरे यांचे महायुतीत स्वागतच करण्यात आले आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिवसेना (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत निवडणूक लढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपण ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यामुळे त्या नेत्याचे ऐकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असता तेव्हा प्रत्येकाने तुमचा उदोउदो केला पाहिजे असे काही कारण नाही. त्यामुळे शिवतारेंच्या मनात आले ते बोलले, असे अजित पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -