घर महाराष्ट्र शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांनी व्यक्त केले मत, म्हणाले...

शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांनी व्यक्त केले मत, म्हणाले…

Subscribe

शरद पवार यांच्या कोल्हापुरातील सभेबाबत शांत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे, असे मत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) हे राजकारणातील चाणक्य आहेत आणि याबाबत सर्वांनाच माहिती आहे. अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर 82 वर्षीय शरद पवार हे पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरले आहेत. पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्याची सुरुवात शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यापासून केली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पवारांनी देखील राजकीय खेळी करत आपल्या नव्या इनिंगची सुरुवात येवल्यातून केली. त्यानंतर त्यांची दुसरी जाहीर सभा ही गुरुवारी (ता. 17 ऑगस्ट) बीडमध्ये झाली. त्यानंतर आता शरद पवार नवी खेळी करत पश्चिम महाराष्ट्रात मोर्चेबांधणीची सुरुवात करणार आहेत. कारण कोल्हापुरात शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली तर राज्यातील तिसरी सभा होणार आहे. परंतु त्यांच्या कोल्हापुरातील सभेबाबत शांत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे, असे मत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी व्यक्त केले आहे. (Ajit Pawar expressed his opinion on Sharad Pawar meeting in Kolhapur)

हेही वाचा – मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना…, चीनवरून ठाकरे गटाचा टोला

- Advertisement -

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवाप म्हणाले की, शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटते, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही खासगीत विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असे कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, 2019 मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून शिवसेनेबरोबर आघाडी केली. शिवसेना आणि भाजपा 25 वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपाबरोबर 25 वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष (भाजपा) तोही चालून घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतली आहे, असे दाखवण्याचे काही कारण नाही, असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला आहे. तर, लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला आहे, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -