घरमहाराष्ट्रपुणेAjit Pawar : आधी संघटना मजबूत करू, नंतर मुख्यमंत्रीपदाचं पाहू- अजित पवार

Ajit Pawar : आधी संघटना मजबूत करू, नंतर मुख्यमंत्रीपदाचं पाहू- अजित पवार

Subscribe

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, असा सल्ला दिला.

पुणे : बाबांनो जरा कळ सोसा. धीर धरा. तुम्ही सारखे मुख्यमंत्रिपद, मुख्यमंत्रिपद म्हणता. असे करू नका. सर्वप्रथम आपली संघटना मजबूत करू. लोकांपर्यंत संघटना पोहोचवू. लोक आपल्याकडे येत आहेत. लोकांचा आपल्यावर विश्वास वाढत आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. (Ajit Pawar First we will strengthen the organization then we will look at the post of Chief Minister Ajit Pawar)

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, असा सल्ला दिला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन महिन्यानंतर लोकसभा निवडणुकी सामोरे जावे लागेल. त्यामुळे महिन्याभरात आचारसंहिता लागेल.

- Advertisement -

हेही वाचा : Sharad Pawar On Fadnavis : कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये – शरद पवार

या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा. त्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडता कामा नये. गटातटाचं राजकारण अजिबात करून नका. काम करताना शंभर टक्के आपल्या मनासारखं काम होत नाही असं वाटत जरी असलं तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो. अनेकांचे विचार काय, हे समजून घेतले पाहिजे. त्यानंतर बहुमताचा आदर करून निर्णय घ्यायचा असतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार याचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

- Advertisement -

हेही वाचा : Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ

तेव्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा इतिहास सांगत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सांगताना अजित पवार म्हणाले की, 1999 ते 2004 सालात आम्ही खूप काम केलं होतं. आम्ही लोकांमध्ये खूप फिरलो. त्यामुळे 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला होता. तर 2004 साली आम्ही मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही, याच्या खोलात मी जात नाही. कारण तेव्हा छगन भुजबळ, आर. आर. पाटील हे तेथे होते. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -