घरताज्या घडामोडीAmit Shah Pune Tour: अमित शाहांच्या मुक्कामासाठी अजित पवारांनी दिला स्वतःचा राखीव...

Amit Shah Pune Tour: अमित शाहांच्या मुक्कामासाठी अजित पवारांनी दिला स्वतःचा राखीव सूट

Subscribe

देशाचे पहिले सरकारमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शाह यांचा दौरा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसीय असणार आहे. रविवारी अमित शाह पुणे दौऱ्यावर असणार आहेत. पुण्यातील पुर्वनियोजित कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. पुण्यात अमित शाह मुक्काम करणार असून त्यांना खासगी ठिकाणी राहण्याची सोय करु नये अशी केंद्राकडून जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले होते. याबाबतची माहिती अजित पवार यांना मिळताच त्यांनी आपला राखीव सूट अमित शाह यांना दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राहण्यासाठी शासकीय ठिकाणी सोय करावी असे पत्र केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे. या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कार्यवाही देखील केली आहे. परंतु यासाठी अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील अजित पवारांचा राखीव सूट त्यांना कशाचाही विचार न करता अमित शाह यांना राहण्यासाठी दिला आहे.

- Advertisement -

पुण्यात व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस असून त्यामध्ये दोन सूट आहेत. यामधील दोन्ही सूट हे वर्षाचे बारा महिने राखीव असतात. एक मुख्यमंत्र्यांसाठी असतो तर दुसरा उपमुख्यमंत्र्यांसाठी आहे. पुणे दौरा असला की अजित पवार याच सूटमध्ये आपल्या बैठका आणि कार्यकर्त्यांना भेटत असतात. परंतु अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या राहण्याची सोय शासकीय ठिकाणी करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली असल्याचे अजित पवार यांना सांगण्यात आले. यावर अजित पवारांनी आपलाच सूट त्यांना देण्यात यावा असे आदेश दिले आहेत.

अमित शाह पहिल्यांदाच सहकार मंत्री झाल्यावर महाराष्ट्रात

केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह पुण्यातील विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पहिल्या दिवशी अहमदनगरमधील प्रवरा येथे आयोजित सहकार परिषदेत उपस्थित होते. यानंतर ते पुण्यच्या दिशेने जातील आणि तिथेच मुक्काम करतील. आगामी पुणे महानगपालिकेच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी अमित शाह संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रात जिल्हा कोऑपरेटीव्ह बॅंकांमध्ये हजारो कोटींचे घोटाळे, अमित शहांचे टीकास्त्र


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -