घरमहाराष्ट्रकेंद्रातील मंत्री आहात केंद्रात काम करा, अजित पवारांचा राणेंना सल्ला

केंद्रातील मंत्री आहात केंद्रात काम करा, अजित पवारांचा राणेंना सल्ला

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातील मंत्री आहात केंद्रात काम करा असा सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी राणेंच्या खात्यावरुन टोला लगावला होता. त्यावर राणेंनी अजित पवार अज्ञानी असल्याचं बोलत पलटवार केला. दरम्यान, आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांना पुण्यात बोलत असताना नारायण राणे यांच्याबददल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी यावर बोलताना, मला नारायण राणे यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपणे चालवायचं आहे ते आम्ही चालवत आहोत. ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांच केंद्राचं काम करावं आम्ही आमचं राज्याचं काम करतो, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

देशमुख प्रकरणावर सध्या बोलणार नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चीट दिली आहे. अशा काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत मी वाचले आहे. अनेक चौकश्या होत असतात. त्या-त्या वेळी सगळेजण चौकशीसाठी सहकार्य करत असतात. मात्र, देशमुख यांच्याबाबत जोपर्यंत मला अहवाल मिळत नाही. तोपर्यंत मी यावर काहीही बोलणार नाही, असं पवार म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -