घरमहाराष्ट्र...त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात घेतले हे चुकीचे, अजित पवारांची टीका

…त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात घेतले हे चुकीचे, अजित पवारांची टीका

Subscribe

ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार झाला. राजभवनात राज्यपाल कोश्यारी यांनी शिंदे गटातील आणि भाजपमधील 18 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांवर आरोप आहेत. यावर विरोधीपक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

मंत्रिमंडळात काही लोकांना घ्यायला नको होते –

- Advertisement -

यावेळी मला मिळालेल्या माहितीनुसार उद्यापर्यंत खातेवाटप होण्याची शक्यत व्यक्त करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराचा मागणी करत होतो. आता शपथविधी केला. मात्र महाराष्ट्रातील जनता केवळ पाहात असते कोण काय करत. ज्यांची प्रतिमा डागाळेली आहे आणि ज्यांना क्लिनचीट मिळालेली नाही, त्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळात घेतले. हे चुकीचं आहे, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीसांनी आरोप केले तेच मंत्रीमंडळात –

- Advertisement -

एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी मंत्रीमंडळात सहकारी घेत असताना ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते. तेच फडणवीस आता आरोप झालेल्या लोकांना मंत्रीमंडळात घेताना शांत बसतात. हे अत्यंत चुकीचं आहे. शिवाय मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान न देणे खटकणारी बाब असल्याचं पवार म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -